धानोरा/भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील रांगी केंद्रातील केंद्रप्रमुखाचे पद मागील सात आठ महिन्यापासून रिक्त असल्याने येथील केंद्रावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो.त्यामुळे येथिल रिक्तपद लवकरात लवकर भरन्याची मागणी पालकानी केली आहे. येतील कार्यरत असणारे केंद्रप्रमुख नंदनवार यांना उन्हाळ्यात हृदयविकाराचा झटका आल्याने ते मरण पावले. त्यानंतर इथे पूर्ण वेळ केंद्रप्रमुखांची गरज असताना अजूनही येथिल केंद्र प्रमुखाचे पद भरण्यात आलेले नाही .उलट केंद्रप्रमुखाचा अतिरिक्त भार निमगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक लांजेवार यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे लांजेवार हे पूर्ण वेळ केंद्रप्रमुखाचा कारभार सांभाळत असल्याने त्याचा विपरीत परिणाम जिल्हा परिषद शाळा निमगाव वर होत आहे.निमगाव येथिल विद्यार्थ्यांचे अपुऱ्या शिक्षका अभावी नुकसान होत आहे. केंद्रप्रमुख पद सांभाळताना ते शाळेला यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ अध्यापन करू शकत नाही तरी शासनाने रांगी केंद्रातील रिक्त असलेले केंद्रप्रमुखाचे पद लवकरात लवकर भरण्यात यावे अशी मागणी पालकांनी केलेली आहे.