
बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
2024 च्या इंदापूर विधानसभा निवडणुकी मध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी 19,410 मतांची आघाडी घेत विजय मिळवत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यावर तिसऱ्यांदा वर्चस्व राखलेले आहे.
दत्तात्रेय भरणे यांनी केला विजयाचा लकी शर्ट परिधान
सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार दत्तात्रय भरणे पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शर्ट परिधान केला होता तो शर्ट 2019 व सलग तिसऱ्यांदा 2024 ला देखील तोच शर्ट परिधान केला.याच शर्टावर घरातून बाहेर पडत गुलाल उधळत त्यांनी जल्लोष केला.
इंदापूर विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना 1,17,226 एकूण मते पडली तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना 97,826 मते पडली.१९ हजार ४१० एवढ्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला.
भरणे आणि पाटील यांच्यामध्ये अतिशय चुरशीत झालेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
या निवडणुकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अटीतटीने प्रयत्न करून सुद्धा यश आले नाही.
यासाठी अनेक ठिकठिकाणी बैठका लावल्या होत्या. तरीसुद्धा शरदचंद्रजी पवार साहेब यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही.
विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यात केलेल्या विकासावर जनतेने विश्वास ठेवून त्यांना साथ देणे पसंत केले.
इंदापूर तालुक्यासाठी आणलेला 6 हजार कोटी विकास निधी,लाडकी बहीण योजनाही इंदापूर तालुक्यात भरभरून आणली. तळागाळात जाऊन जोडलेला जनसामान्य मतदार यांनी दत्तात्रय भरणे यांना तारले असून विकासाला साथ दिल्याचे दिसून आले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर तात्काळ त्यांची महाविकास आघाडी मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर झाली राज्यांमधील महत्त्वाची लढत म्हणून सर्वांचे लक्ष या इंदापूर विधानसभा निवडणुकीकडे लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली होती महाविकास आघाडी मधून प्रवीण दशरथ माने यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत होते.
शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते.हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज असलेल्या बड्या नेत्यांची समजूत काढून मुठ बांधण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला.
दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी आपला उमेदवार विजय होण्यासाठी अनेक दुसऱ्या फळीतील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपली पार्टी जड करण्याचा प्रयत्न केला.
मागील दहा वर्ष सत्तेपासून वंचित राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची साथ अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोडली.त्यामध्ये कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहळकर आदीसह अनेकांचा समावेश आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूर सिंह पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची साथ देणे पसंत केले. या प्रामुख्या कारणामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते आहे.
पहिल्या फेरीत दत्तात्रय भरणे यांना 4866 तर हर्षवर्धन पाटील यांना 4530 मते मिळाली अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी 1250 मते घेतली.दत्तात्रय भरणे यांनी 3367 मतांची आघाडी घेतली.पहिल्या फेरीतून दत्तात्रय भरणे यांनी मतांची आघाडी कायम ठेवली.शेवटच्या फेरीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी 1 लाख 16 हजार 748 मते घेतली.तर हर्षवर्धन पाटील यांना 97 हजार 673 मते मिळाली.
अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी 37 हजार 843 मते घेतले. दत्तात्रेय भरणे यांनी 19,410 मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटील यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव व्हावे लागले.एकूण 25 मतमोजणीच्या फेऱ्या पार पाडल्या.14 टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखली हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपला सोडचिट्टी देत एंनवेळी प्रवेश करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र यांचा कोणताही फायदा त्यांना निवडणुकीत झाल्याचे दिसून आले नाही.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक आसणारे प्रवीण माने अपक्ष लढल्याने त्यांचा फटका हर्षवर्धन पाटील यांना बसला. हर्षवर्धन पाटील यांना शरदचंद्र पवार पक्षातील नाराजी दूर करण्यात अपयश आले.
त्यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भारत शाहा यांची नाराजी त्यांना दूर करता आली नाही. संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
ओबीसीची वज्रमुठ हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात एकवटली त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पराभव पत्करावा लागला.
******
चौकट —
इंदापूर तालुक्याने मला पाठीमागील दहा वर्षासाठी विकास केला म्हणून सेवा करण्याची संधी दिली.तसेच इथून पुढेही मला विश्वास दिला आणि पुढची 5 वर्ष आजूनही सेवा करण्यासाठी मला मतदार जनतेने संधी दिलेली आहे.
विकास कामा सोबतच माजी लाडकी बहीण योजना वयोश्री योजना आणि आरोग्य सेवा यामुळे जनतेने माझ्या बाजूने मताचा कौल दिला. आगामी 5 वर्षात मतदारांचा विश्वास आहे.
कुठेही तडा जाऊ देणार नाही. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे उद्गार,,
*****
चौकट….
हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाची पाच कारणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोडणी वाहतूकदारांना बिलासाठी कारखान्यांकडून झालेली दिरंगाई,, मागील दहा वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी ज्यादा काळ प्रतीक्षा करावी लागली,,ऊस उत्पादक शेतकरी वर्गात असलेली नाराजी निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी पक्ष प्रवेश,,हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी भाजपमध्ये आसताना न केलेले काम,, कार्यकर्ते व समर्थकांच्यात आसलेली नाराजी दूर करता आली नाही.
*****
चौकट….
दत्तात्रेय भरणे यांच्या विजयाची पाच कारणे,,सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सातत्याने असलेला जनसंपर्क,, गावोगावी केलेली विकास कामे त्यासाठी शासनाचा 6000 हाजार कोटी रुपयांचा विकास निधी,,,मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी सूक्ष्म पद्धतीने केल्यामुळे मतांच्या रूपाने मिळालेली लाडक्या बहिणीची माया,,, लाकडी निंबोडी योजनेचे काम पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी केलेला प्रयत्न…
*****
चौकट….
पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे ज्या बाजूला आसतील त्याच बाजूकडील इंदापूर विधानसभेचा आमदार तिसऱ्यांदाही निवडून आलेला आहे.
हा इतिहास गेली दहा वर्षापासून इंदापूर तालुक्याला पहावयास मिळत आहे.नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर विधान परिषदेवर इंदापूर मधून आप्पासाहेब जगदाळे यांची वर्णी लागणार अशी शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यातील जनतेने निवडणुकीच्या काळामध्ये अनेक परा कष्ट करून मतदान घडवून आणल्यामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व इतर मान्यवर यांचे दत्तात्रय मामा भरणे यांनी विजय घोषित झाल्यानंतर आभार व्यक्त केले.