चिमूर विधानसभा मतदारसंघातून हरलेले डॉ.सतीश वारजूकर बाजी मारुन गेले… — एक कुशल व तत्पर नेतृत्वाच्या भुमिकांकडे मतदारांचे परत लक्ष…‌

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

         चिमूर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत झाली होती आणि डॉ.सतीश वारजूकर निवडून येणार अशी विश्वासपुर्ण चर्चा मतदारांत होती.पण,ईव्हीएम मशीन अन्वये निवडणूक निकालाने महाराष्ट्र राज्यातील धुरंधरांसह डॉ.सतीश वारजूकरांना पराभूत केले,हे एक अनाकलनीय आश्चर्यच ठरले आहे.

          डॉ.सतीश वारजूकर हे चिमूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले असले तरी ते मतदारांच्या मनामनात व हृदयात येवढे बसले की त्यांना त्यांच्या मनातून व हृदयातून काढले जाणे शक्य नाही.म्हणूनच डॉ.सतीश वारजूकर हे पराभूत होऊन सुद्धा बाजी मारुन गेले असेच चित्र चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या सकारात्मक दृष्टिकोनातले आहे एवढे नक्की!

       आमदार किर्तीकुमार भांगडिया हे तिसऱ्यांदा आमदार झाले असले तरी झुंजार नेतृत्वाची कसब डॉ‌.सतीश वारजूकरांसारखी त्यांच्यात नाही हे एक वास्तव आहे.आणि ते भारतीय संविधानाला अनुसरून लोकहितासाठी संघर्ष करुच शकत नाही हे दुसरे सत्य आहे.

              डॉ.सतीश वारजूकरांनी जनतेच्या हितासाठी केलेली अनेक आंदोलने,शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेले अनेक मोर्चे,विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी केलेले धरणे आंदोलन,नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लक्षवेधक पार पाडलेले मोर्चा द्वारे कुशल कर्तव्य,विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी केलेली सुविधा,अनेक गोरगरीबांना आरोग्य उपचारासाठी केलेली आर्थिक मदत,आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची न्यायबध्द वृत्ती नजरेआड करता येत नाही.

          डॉ‌.सतीश वारजूकरांना शासकीय प्रतिनिधीत्वाचे संरक्षण नसताना ते चिमूर विधानसभा मतदारसंघात जनतेच्या हितासाठी हमेशा लढतात व जनतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर व जागरूक असतात.या सारखे संघर्षमय तत्पर व जागरूक असे अमुल्य भाग्य चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना लाभले हिच मोठी बाब आहे.

              चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत जनतेच्या हितासाठी लढणारा ताकदवर नेता डॉ.सतीश वारजूकर यांच्या सारखा असल्यामुळे या मतदारसंघात जनतेचे अहित करण्यासाठी भांडवलदारांना जमत नाही हे सत्य चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आजपासूनच समजून घ्यायला सुरुवात केली पाहिजे.

            तद्वतच परिशिमन आयोगाने मतदार संघ बदलवले नाही तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत डॉ‌.सतीश वारजूकर सहज निवडून येतील आणि चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदार त्यांना भरभरून साथ देतील असे भाकीत गृहित धरण्यास हरकत नाही.

         डॉ.सतीश वारजूकरांकडे अनेक असे सकारात्मक आणि दुरदृष्टी अंतर्गत लोकहिताचे गुणधर्म आहेत की ते चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे,बेरोजगारांचे,विद्यार्थ्यांचे,शेतकऱ्यांचे,महिलांचे,भविष्य उज्ज्वल करु शकतात.

         म्हणूनच चिमूर विधानसभा मतदारसंघातील मी एक मतदार असल्याने मला डॉ‌.सतीश वारजूकर सारख्या जननायकाला आमदार बनविण्यासाठी सहकार्य करायचे आहे.

            चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना माझे कळकळीचे आव्हान आहे की,”गेले ते पावले…”पण,सन २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ‌‌.सतीश वारजूकरांना आमदार बनविण्यासाठी मनाने व विचाराने आजपासूनच कामाला लागले पाहिजे.काम करीत राहिले पाहिजे.

            डॉ.सतीश वारजूकरांसारखे चिमूर विधानसभेला मिळालेले,”खंबीर असे जनहिताचे नेतृत्व,मतदारांनी स्विकारलेच पाहिजे आणि असे खंबीर नेतृत्व आतापासूनच मनात बिंबवून ठेवले पाहिजे!..

             याचबरोबर डॉ.सतीश वारजूकर हे चिमूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले असले तरी ते भांडवलदार शोषकांसाठी धाक आहेत हे खरेच आहे.म्हणूनच त्यांना चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची सातत्याने साथ राहणार आहे एवढे मात्र निश्चित!