कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी : – पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्वेस १३ कि.मी. अंतरावर असलेले मौजा शिवारातील,डोरली गाव येथील वार्ड क्रमांक २ मध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय ग.भा.वैशाली बाबाराव निकोसे ह्या महिलेने आपल्या राहत्या घराच्या फाट्याला नायालोन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली.
मृतक ग.भा.वैशाली बाबाराव निकोसे वय ४७ वर्ष ही मागील दोन वर्षा पासुन मानसिक आजाराने त्रस्त होती.यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी मुलगा मयुर बाबाराव निकोसे वय २३ वर्ष रा. वार्ड नं २ डोरली यांचे तक्रारी वरुन पोलिसांनी १८ नोव्हेंबरला मर्ग क्रमांक ४२/२०२३,कलम १७४ नुसार पारशिवनी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला.
पोलीसांनी घटनास्थळी पोहचून स्थळ पंचनामा केला व मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता पारशिवनी ग्रामिण रुग्णालय येथे नेण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक राहुल सोनवने यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुरेश धुर्वे हे पुढील तपास करीत आहे .