नीरा नरसिंहपुर दिनांक: 25
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
लुमेवाडी तालुका इंदापूर येथील बायपास पालखी मार्गाच्या मोठ्या फुलाचे काम गतीने चालू आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी याच मार्गाने जाणार आहे. गेली आनेक दिवसापासून काम चालू आहे. पावसाळ्यात निरा नदीला आलेला पूर आणि पाठीमागच्या काळात पावसाची रिमझिम चालू होती. आशा होणाऱ्या तांत्रिक आडचणीमुळे कामाला गती नव्हती.नदीपात्रातील उभे केलेले अर्धवट कॉलम आसल्याने हे काम गतीने चालु आहे.
लुमेवाडी येथील बायपास रस्ता व नीरा नदीवर चालू आसलेला मोठ्या मुलाचे काम लवकरच पूर्ण करावे आशी येथील भाविक भक्त व ग्रामस्थांची मागणी आहे, इंदापूर ते पंढरपूर या पालखी मार्गाचे काम आनेक दिवसापासून चालू आहे.परंतु कामला आणखी गती देऊन काम पूर्ण करावे आशी येथील ग्रामस्थांची व भाविकांची मागणी आहे.