गानली समाजाच्या वतीने कोजागिरी निमित्य विविध स्पर्धा व सत्कार समारंभ…

    सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

          कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो.हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. या पौर्णिमेचे औचित्य साधून गानली समाजाच्या वतीने कोजागिरी निमित्य विविध स्पर्धा व सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

          या कार्यक्रमात भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,समाजाचे माजी अध्यक्ष विनोद चाल्लावार,शंकर गुंडावार,घनश्याम संगीडवार ,सुरेश का.संतोषवार,राजू रक्षमवार,सुरेश ना.संतोषवार,व जेष्ठ नागरिक शंकर चाल्लावार तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर व स्वछतेला मिशन म्हणून काम करणारे व्यसनमुक्त युवक व स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांचा समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

           विविध स्पर्धा समाजाच्या वतीने घेण्यात आल्या त्यात लहान मुलांची संगीत खुर्ची, महिलांची लक्की कार्ड गेम, हार कपल गेम इत्याती खेळ घेण्यात आले.मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

        कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून प्रस्ताविक गानली समाजाचे अध्यक्ष व नगरसेवक गुणवंत सुरमवार, संचालन मंजू पोटवार,आभार समाजाच्या सचिव व नगरसेवक नीलम सूरमवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचें सहकार्य केले.