धुळे येथे बहुजन हक्क परिषद दौऱ्या दरम्यान आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सांसद चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासमोर मांडली गडचिरोली जिल्हाची व्यथा…

 

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम भाग असून हा जिल्हा वन संपदेने व्यापलेला आहे. येथील स्थानिक सुशीक्षित बेरोजगार तरुण बहूसंख्येने दिसून येत आहेत त्यांच्या हातांना काम नाही की  नौकरी नाही.

          गडचिरोली येणारा एकमेव  रेल्वे मार्गाचे काम संत गतीने चालू आहे. गडचिरोली ते भंडारा समृद्धी महामार्ग हा मंजूर झालेला आहे तो मार्ग न करता गडचिरोली ते नागपूर या मार्गाला मंजुरी द्यावी आणी हा समृद्धी मार्गाचे काम चालू करण्यात यावे.

         आरोग्य सोयी सुविधा पुरवणे व जिल्हा परिषद शाळेना खासगीकरण न करता इंग्लिश मिडीयम शाळा चालू कराव्यात, समान शिक्षण समान संधी व जिल्हातील रखडलेले रस्ते प्रस्तापीत झालेले रस्ते तात्काळ सुरु करण्यात यावे, सुरजागड,कोनसरी लॉयल्ड मेटल कंपनी मध्ये स्थानिक गडचिरोली जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी  यांना प्राधान्य द्यावा,  पेसा कायदा मधील तलाठी भरतीमधील तात्पुरता सेवेत सामवून घेतलेल्याना कायमस्वरूपी सामावून घ्यावा व रिक्तपदे भरण्यात यावे इत्यादी समस्याचे पाढे वाचण्यात आले.

         यावेळी जील्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हा अध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा संघटक हंसराज उराडे, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषी सहारे, गडचिरोली तालुका कार्याध्यक्ष दामले, मीडिया प्रभारी शतिश दुर्गमवार, आझाद समाज पार्टी गडचिरोली चे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.