युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षांपासून च्या आर्थिक व्यवहारांची व कारभाराची खुलासेवार माहिती देण्या बाबतचा अर्ज माहिती अधिकार कायद्यांतर्गत स्थानिक नागरिक हक्क संरक्षण समिती च्या वतीने जेष्ठ विधिज्ञ व नागरिक हक्क संरक्षण समिती चे अध्यक्ष ऍड. संतोष कोल्हे यांनी स्थानिक पं स चे खंडविकास अधिकारी यांच्या कडे नियमानुसार अर्ज सादर करुन मागितली आहे, ह्या अर्जामुळे ग्रामीण भागातील ग्राम पंचायत स्तरावरील अनेक आर्थिक प्रकरणे उघडकीस येणार असल्याची चर्चा पंचायत समिती स्तरावर जोरदार सुरु आहे .
दरम्यान दर्यापुर प़ंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायती मधील नागरिकांनी आपल्या संबंधित ग्राम पंचायतीच्या कारभाराबाबत काही तक्रारी असल्यास त्या नागरी हक्क संरक्षण समिती कडे पूराव्यानिशी सादर कराव्या असे आवाहन ऍड.संतोष कोल्हे यांनी ग्रामस्थाना केले आहे.
सदर माहिती अधिकाराचा अर्ज खंडविकास अधिकारी यांना देताना ,नागरिक हक्क संरक्षण समिती चे सचिव व जेष्ठ पत्रकार शरद रोहणकर,तथा सदस्य सुधिर तायडे विनोद घुणारे, आदी उपस्थित होते.
सदर अर्जावर पं स चे खंडविकास अधिकारी काय निर्णय देतात यावर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे एवढे मात्र खरे.