प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा क्रीडा परिषद चंद्रपूर च्या वतीने मनपास्तरीय/जिल्हास्तरीय हॉकी 14, 17 व 19 वर्ष आतील मुले / मुली क्रीडा स्पर्धांचे आयोजन पोलीस परेड मैदान, चंद्रपूर येथे 21 ते 23 सप्टेंबर 2024 रोजी पार पडले.
जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजनबद्धतेने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील सहभागी वीवीध शाळा / महावीदयालयाचे खेळाडू, क्रीडा शिक्षक, शिक्षक, क्रीडाप्रेमी, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दिनांक २१ सप्टेंबर ला उद्घाटनाचे प्रास्ताविक मोरेश्वर गायकवाड, क्रीडा अधीकारी यांनी केले. अवीनाश पूंड, जिल्हा क्रीडा अधीकारी, चंद्रपूर तसेच नवघरे, राखीव पोलीस निरीक्षक, यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच नंदू अवारे, क्रीडा अधीकारी, यांनी शुभेच्छा दिल्या. हॉकी प्रमोटर असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभाकर तोगर, सचिव रुपेश चौहान, कोषाध्यक्ष प्रेम गावंडे व सर्व पंच खेळाडू उपस्थीत होते.
मनपास्तरीय/जिल्हास्तरीय हॉकी 14, 17 व 19 वर्ष आतील मुले मुली विजयी संघ विभागस्तरावर पाठविण्यात येतील. असे अविनाश पुंड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर कळविले आहे.