शाहू,बाबासाहेब, कांशीरामजी यांचा विचार गावोगावी पोचवा :-  डॉ.ऍड.सुरेश माने… 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

   पारशिवनी:- बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्रातील पारशिवनी येथे आयोजित कार्यक्रमात पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या मार्गदर्शनातून उपस्थिताना संभोधित करत होते.

           सत्यशोधक समाज, ओबीसी जनगणना, आगामी विधानसभा निवडणूक ह्या विषयांचे औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय कीर्ती चे गायक अरुण शहारे सौ. छाया मनवर यांचा जागर संविधानाचा प्रबोधनपर गीत गायन सादर करण्यात आले.

        महापुरुषाच्या प्रतिमाना मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनातं ऍड सुरेश माने पुढे म्हणाले की देशात आणि राज्यात अराजकतेचे वातावरण निर्माण करून तुष्टीकरण केले जात आहे अन्याय अत्याचार घडवून आणले जात आहेत. बहुजन समाजाला त्याच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे. एससी , एसटी ओबीसी याचे न्यायालयाच्या माध्यमातून जात वर्गीकरण करून विभाजन केले जात आहे. बहुजन समाजात विषमता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पुढे माने साहेबांनी तळागाळातील माणसापर्यंत संविधान पोहचवण्याचे आणि बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टी सोबत जुळण्याचे आवाहन केले.

      आदिवासी अभ्यासक वरिष्ठ सत्यशोधक मा. एल के मडावी यांनी आदिवासी समाजाला धार्मिक अनिष्ठ चाली रीती झुगारून फुले, शाहू, आंबेडकराचे विचार स्वीकारण्याचे आवाहन केले. ह्या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विदर्भ राज्य अध्यक्ष विशेषजी फुटाणे, सुप्रसिद्ध गायक अनिवृद्ध शेवाळे माजी पंचायत समिती सदस्या सत्यफूला मडावी, इत्यादीनी संबोधित केले. तसेच पंजाबराव मेश्राम, ज़िल्हाध्यक्ष डाँ विनोद रंगारी, सौ.वंदना लांजेवार, सौ.ललिता लाले, पारशीवनी तालुका अध्यक्ष सतीश साकोरे, श्री.राजू गुरधे श्री. योगराज शेंडे, श्री.हरीश भेलावे व महिला आघाडी निर्मला मरकाम, गौतम सावरकर, प्रफुल खुबालकर कार्यक्रमाला उपस्थित होते. 

           ह्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामटेक विधानसभा सभा प्रमुख श्री.शांताराम जळते यांनी केले, संचालन ज़िल्हाध्यक्ष कृपा सागर भोवते यांनी केले. बि आर एस पी च्या कार्याला गती देण्यासाठी सिने कलाकार राजू चक्रवर्ती यांनी पक्ष प्रवेश घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वश्री भगवानदादा यादव, प्रवीण सतदेवे, विशाधर कांबळे, जयंत गटपाडे,प्रशांत सावरकर, मंगला साकोरे, मलाबाई राऊत, सुमन कामठे, ताराबाई नागपुरे राजीव सहारे,सौ. लता जळते, सौ. चंद्रकांता गुडधे, सौ.वर्षा फुटाणे, सौ.नेहा भेलावे यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अथक परिश्रम केले