अंगणवाडी सेविका, मदतनीस धडकल्या बाल विकास प्रकल्प कार्यालयावर… — सात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सहभाग…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवारला दुपारी एक वाजता राज्य सरकारच्या फसव्या आश्वासनाचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी सेविकां मदतनिस यांनी विवीध मागण्यासाठी हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदण देत मोर्चा सरळ पंचायत समिती परिसरातील एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना कार्यालयावर धडकला. 

        मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. दरम्यान माधूरी विर, कमल बारसागडे, प्रभा चांबरकर, पोर्णीमा बोरकर, चिमूर विधानसभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके इमरान कुरेशी यांनी सभेला मार्गदर्शन केले. अंगणवाडी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, म्हातारपणात उदरनिर्वाह करण्यासाठी मानधनाची अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, अहर्ताप्राप्त सेविकांमधून पर्यवेशिकांच्या जागा भरण्यात याव्या, सर्वोच्छ न्यायालयाने दिलेल्या ग्रॅज्युयीटीच्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, सेवानिवृत्त अंगणवादी कर्मचायांना एक रक्कमी लाभ देण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन अंगणवादी सेविका मदतनिस यांनी प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांना देण्यात आले. दरम्यान निवेदणाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना पाठवित असल्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले.

          गेली ४८ वर्षे कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरडल्या आहेत त्यांच्या कडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत. निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मोर्चाचे आयोजन केले.

         या मोर्चात तालुक्यातील बचत गट आहार पुरवठा संघटना व चिमूर नागभिड भद्रावती मुल ब्रम्हपूरी सिंदेवाही वरोरा येथील सात तालुक्यातील हजारो अंगणवाडी सेविकांचा समावेश होता. निवेदण देताना माधुरी रमेश विर, इंदिरा आत्राम, प्रभा विश्वनाथ चामटकर, संयोगीता वसंता गेडाम, कमल सुखदेव बारसागडे, सविता सुखदेव चौधरी, ललीता अनिल सोनूले, विजया भास्कर बरडे, उषा रामहरी राऊत, अर्चना मुरलीधर भूरसे, लता राजू देवगडे, सुर्वणा डूकरे अन्नपूर्णा हिरादेवे, रोशनी चंदेल, आदी उपस्थित होते.