मालेवाड्यात ग्रामस्वच्छता रॅली…

 

छन्ना खोब्रागडे

   प्रतिनिधी

         श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत मालेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोज सोमवारला दुपारी बारा वाजता ग्राम स्वच्छता रॅली काढण्यात आली. दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा मुक्त गाव हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे महत्व गावातील प्रत्येक नागरिकाला कळावे म्हणून ही रॅली संपूर्ण गावात काढण्यात आली. रॅलीतील विद्यार्थ्यांनी जनतेला स्वच्छतेचे धडे दिले. 

           यामध्ये प्रामुख्याने सचिव श्री. अंबादे, श्री. टी.एफ.बोगा माजी पंचायत समिती सदस्य,अनुसया पेंदाम सरपंच, आनंदराव बोगा माजी सरपंच, प्राचार्य जिभकाटे सर, मुख्याध्यापक सोनकुसरे सर, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ,तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षक यांचा सहभाग होता.