ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली:विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कम्प्युटरच्या युगामध्ये अंधश्रद्धांचे मूळ ग्रामीण क्षेत्रांमध्ये नव्हे शहरी भागात सुद्धा अंधश्रद्धा पसरलेली आहे.
देशाला विज्ञाननिष्ठ व बलवान बनवायचे असेल तर समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धेचे किड धुवून काढली पाहिजे.
जादूटोणा,भूत,बारामती,मंत्रतंत्र , चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे हे जर कोणी सिद्ध करून दाखवत असेल तर त्याला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती २५ लाखाचे बक्षीस देते असे मत अखिल भारतीय अंधश्रधा निर्मूलन समितीचे भंडारा जिल्हा संघटक डी.जी.रंगारी यांनी आदर्श बाल गणेश उत्सव मंडळ चीचटोला या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान करताना आपले मत मांडले.
याप्रसंगी पळसगावचे सरपंच प्रकाश बागडे,पुरुषोत्तम भंडारकर,शीलवान रंगारी,स्वप्निल मेंढे,गिरीधारी मेंढे,भगवान कोरे,रूपचंद भेंडारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डी.जी.रंगारी यांनी सांगितले की समाजामध्ये जादूटोण्याच्या नावाखाली भाऊ भावाचाच खून करतो असा आपल्या लक्षात येते,चौकामध्ये लिंबू फेकून अंधश्रद्धा पसरवली जाते व भीती निर्माण केली जाते,बुवा-बाबा महिलांना आपल्या नादी लावून लैंगिक शोषणाचे काम करतात व आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास देतात.
यामुळे आपण जीवनामध्ये वावरत असताना चिकित्सा केली पाहिजे कोणती गोष्ट खरी आणि कोणती गोष्ट खोटी आहे.प्रत्येक गोष्टीची चिकित्सा झाली पाहिजे आणि ती गोष्ट आपल्या जीवनात फलदायी जी असेल ती गोष्ट आपण स्वीकारला पाहिजे,तेव्हा कुठे समाजामध्ये परिवर्तन घडून येईल.
समाजामध्ये जर परिवर्तन घडवून आले तर राष्ट्रांमध्ये परिवर्तन घडवून येईल असे मत डी.जी.रंगारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर बोलताना व्याख्यान करताना आपले मत मांडले व विविध प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी व्याख्यान केले.
त्यामध्ये तांदूळ भरलेला लोटा,पेचकसने उचलणे,नारळातून पैसे काढणे,लिंबू मधून रक्त काढणे,जडता कापूर हातावर जाळणे,जळता कापूर तोंडात टाकने,फुलांचे कलर बदलणे,कानाने चिठ्ठ्या वाचणे,पत्त्यांच्या कलर बदलविणे अअशा विविध प्रयोगाच्या माध्यमातून बुवा बाबा कसे फसवतात या संबंधाने उदाहरण दिले.
त्याचप्रमाणे परिसरातील घडलेल्या घटना यांचा वापर करून आपण भूत,बारामती, जादूटोणा,तंत्रमंत्र यावर विश्वास ठेवू नये.जर कोणी सिद्ध करून देत असेल तर त्याला २५ लाख रुपये बक्षीस देते असे आव्हान त्यांनी केले.
परंतु त्या ठिकाणी उपस्थितांपैकी कोणीही समोर आला नाही.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक पळसगावचे सरपंच प्रकाश बागडे यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल मेंढे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पुरुषोत्तम भेडारकर, स्वप्निल मेंढे ,भगवान कोरे, रूपचंद भेंडारकर, लोकेश भेडारकर, गोपाल दोनोडे ,महेश भेडारकर ,अनिल वाढई व इतर भरपूर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.