ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली : शहरासह जिल्ह्यातील एकमेव प्राचीन श्री गणपती मंदिर गणेश चौकात श्री बाल गणेश उत्सव मंडळातील पदाधिकारी आणि सदस्य गणेशोत्सवा निमित्त दहा दिवसीय उत्सव साजरा करीत आहेत.
पण वैशिष्ट्य असे की ककोडी ( जि. गोंदिया ) येथून आलेली श्री गणेश मुर्ती एवढी आकर्षक ठरली की,प्रत्येकांच्या जन चर्चेतून सदर श्रींच्या मुर्तीमध्ये सौंदर्य कौशल्यातंर्गत इतिहासीक जिवंतपणा असल्याची प्रशंसा होत आहे व साकोली,सेंदुरवाफा शहरासह ग्रामीण भागातील जनतेत सदभावना पुर्वक प्रतिक्रिया उमटत आहेत.
श्री गणेश स्थापना मंडपात भारतीय इस्रो शक्तीची झलक यातून चंद्रयान – ३ त्यातून तिरंगा ध्वजासह उतरणारा प्रज्ञान रोवर आणि सुर्याकडे झेपविणारा सोलर पॅलोड आदित्य एल – १ ची प्रतिकृती येथे साकारून देशाभिमान आणि बलाढ्य भारत देशाच्या गर्वाला हि या देखाव्यातून मानवंदना दिली आहे हे विशेष उल्लेखनीय.
याचबरोबर मंडळाने विविध जनजागृती फलकांवरील विविध घोषवाक्ये व संदेशात्मक लिखाणामुळे श्री गणेश मंदिर चौकामध्ये एक वेगळीच झलक पहायला मिळत आहे.
यातही लहान मुलामुलींसह खेळोत्तेजक विविध चमचा गोळी,बटाटा वडा,हांडीफोड व इतर खेळ स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,महिलांसाठी हळदीकुंकू,संगीतमय भजनावली,मुलांसाठी पारीतोषिके व बक्षीस समारंभ यासह गुरूवार २८ सप्टेंबरला भव्य महाप्रसादाचेही आयोजन केले आहे.
याचबरोबर सायं ५ वा. याच दिवशी गोविंदा चमुंसह मनोरा दहीहंडी फोडण्याचा जल्लोषही आयोजन करण्यात आले आहे.
आणि अनंत चतुर्दशी २८ सप्टें.सायं. ७ वाजता पासून श्री बाप्पांची संगीतमय तालावर शोभायात्रा मिरवणूक निघत श्री. रामभक्त हनुमान मंदिर तलाव वार्ड येथे भक्तिभावाने श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे .
श्री बाल गणेश उत्सव मंडळ गणेश मंदिर चौक गणेश वार्ड साकोली येथील अध्यक्ष – कुणाल देशमुख, उपाध्यक्ष – आशिष कापगते, कोषाध्यक्ष – रोहित गुप्ता, प्रज्वल रोकडे, सचिव – विवेक बैरागी, शैलेश गोबाडे, व्यवस्था प्रमुख – आदित्य चेडगे, रितीक तिडके, कार्यवाह – राजू देशमुख, लिलाधर मुरकुटे, वरूण कळपते, शुभम देशमुख, सहकार्यवाह – आशिष चेडगे, निकेश कापगते, मनिष मुलवाणी, अशोक देशमुख, पुजारी – अशोक गुप्ता, सुरेश अंदूलकर, क्रिडा विभाग – मयूर देशमुख, तरूण जैन, मोहित आगाशे, संकेत तिडके, हर्ष तिडके, निकेश सयाम, रितीक बडोले, आरव चेडगे, पार्थ अंदूलकर, सौरभ राऊत, सांस्कृतिक विभाग – अनुराग कापगते, दक्ष देशमुख, वरूण देशमुख, आकाश परसगडे, प्रणित मंडारे, गोलू कापगते, चेतन देशमुख, प्रशांत अंदूलकर, आशिष सयाम, महिला ( पूजाविधी ) मंडळ – शशिकला कापगते, लता कापगते, शोभा कापगते, ज्योत्सना देशमुख, प्रिया चेडगे, पल्लवी अंदूलकर, रश्मी देशमुख, प्रिती देशमुख, सुरभी डुंभरे, शोभा डुंभरे, शोभना रोकडे, मनिषा तिडके, ज्योती भारद्वाज, ज्योती भोंगाने, कविता देशमुख, सुनिता कापगते, शुभा गुप्ता, वनिता कापगते, शारदा कळपते, उषा पारधी, छाया देशमुख, महिला सांस्कृतिक विभाग – बुलबुल जैन, निधी कापगते, पम्मी जैन, प्रांजली कापगते, सोनाली पारधी, मिनल पारधी, आयुषि मुलवाणी, प्रिती रोकडे, काजल डोंगरवार, मोनिका डोंगरवार, दिया भारद्वाज, श्रेया तिडके, दृष्टी परसगडे, प्रकृती भोंगाने, मुर्ती देणगीदाते – सुरेश नशिने, मार्गदर्शक मनोहर कापगते, श्रीराम कापगते, गणेश देशमुख, डॉ. हेमकृष्ण कापगते, उदाराम कापगते, शरद गुप्ता, आशिष गुप्ता, हेमंत भारद्वाज, रमेश डुंभरे, प्रकाश रोकडे, अनिल गुप्ता, ॲड. गुप्ता, रवि भोंगाणे आणि सर्व मंडळातील पदाधिकारी सदस्यगण दहा दिवसीय गणेशोत्सव आनंदात शांतता व सुव्यवस्थेत संपन्न करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.