दिं.२५ सप्टेंबर २०२२

 

सावली:-(सुधाकर दुधे)

 

       खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.या जयंतीच्या निमित्ताने एकात्म मानववाद एवं अंतोदयेचे प्रणेते,श्रेष्ठ संघटनकर्ता,जनसेवा ची प्रतिमूर्ती, राष्ट्रवादी महान विचारक,पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन केले.

     भारताचे लोकप्रिय पंतप्रधान,आत्मनिर्भर भारताचे प्रणेते,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर ह्या पंधरवडा कार्यक्रमा निमित्ताने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती बोथली येथे साजरी करण्यात आली.

   या कार्यक्रमा प्रसंगी खा.श्री. अशोकजी नेते तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी,जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे चांगदेवजी फाये,तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,ता.महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोमावार,माजी बांधकाम सभापती संतोषभाऊ तंगडपलीवार,कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,जेष्ठ नेते प्रकाश पा.गडमवार,दौलतजी भोपये, दयाकर पा.गडमवार, मनिषाताई चिमुरकर माजी जि.प. सदस्या, निलमताई सुरमवार आशिष कार्लेकर शहर अध्यक्ष निखील सुरमवार इम्रान शेख प्रसाद जक्कुलवार ,विठ्ठल येगावार सरपंच चांदली,राकेश विरमलवार, मोतीराम चिमुरकर,गिरिष चिमुरकर,लोकनाथ रायपुरे,अंकुश भोपये, चौधरी जी,येलंटिवारजी, तसेच भाजपाचे पदाधिकारी व अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com