ही मागणी शासनाने मान्य न केल्यास वारकरी साहित्य परिषद आंदोलन करेल आणि वेळ पडल्यास वारी थांबवू .:-विठ्ठल पाटील

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : अंधश्रद्धा आणि जादूटोणा निर्मूलंनासाठी असणारे बजेट कोठेही खर्च होऊन वाया जाते असा आरोप करत गळ्यात माळ घातलेला वारकरी व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत वारी करत असतो.

       चुकीच्या ठिकाणी खर्च होणाऱ्या निधीतून दिंड्यांना 50 हजाराचे अनुदान दिल्यास परिस्थितीमुळे वारी करता न येणाऱ्या हजारो इतर गोरगरीब कष्टकऱ्यांना या पैशातून वारी घडेल असा अजब दावा विठ्ठल पाटील यांनी केला आहे. हे अनुदान देताना मंदिर समिती अथवा तहसीलदार यांच्याकडून माहिती घेऊन अनुदान वितरित करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत. 

वेळ पडल्यास वारी थांबवण्याचा इशारा

        आषाढी यात्रा काळात विविध पालखी सोहळ्यातून जवळपास 4500 पेक्षा जास्त दिंड्या पायी चालत येत असतात.आता पाटील यांच्या मागणीनुसार साधारण साडे बावीस कोटी रुपये शासनाला द्यावे लागणार आहेत . शासन हे पैसे देईल देखील मात्र वारकरी संप्रदायाला आपल्या पवित्र वारीसाठी अशी शासनाकडून आर्थिक मदत चालणार आहे का हाच वादाचा मुद्दा ठरणार आहे . ही मागणी शासनाने मान्य न केल्यास वारकरी साहित्य परिषद आंदोलन करेल आणि वेळ पडल्यास वारी थांबवू असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.

        नवा वाद उभा राहण्याची शक्यता 

         विठुरायाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने वारकरी पायी चालत येत असतात.वारकरी संप्रदाय हा आपल्या परंपरा पाळत चालत येत असताना शासन अथवा कोणाच्या मदतीवर कधीच अवलंबून नसतो मात्र आता विठ्ठल पाटील यांच्या मागणीने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे .