नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” सेवा पंधरवाडा म्हणून घोषित करण्यात आला असून या निमित्ताने डॉक्टर अजयराव तुमसरे यांच्या मुक्ताई क्लीनिक च्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .शिबिरात शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
शिबिराचे उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार बाळा (राजेश) काशीवार, भंडारा जिल्हा भाजपा अध्यक्ष शिवराम गिरहेपुंजे, वैद्यकीय अधिकारी संदीप कुमार गजभिये, साकोली तालुका भाजपा अध्यक्ष लखन बर्वे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष इंद्रायणी कापगते, माजी नगराध्यक्ष धनवंता राऊत, कुंभली जि. प. सदस्या वनिता डोये, एकोडी जि. प.सदस्या माहेश्वरी नेवारे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष जगन ऊके ,भाजपा शहराध्यक्ष किशोर पोगडे ,शेंदुरवाफा शहराध्यक्ष शंकर हातझाडे,निशा ईसापुरे, रेखा भाजीपाले ,लता कापगते, भीमावती पटले ,आशा शेंडे, देवनाथ राहांगडाले ,प्रा. प्रदीप गोमासे ,बापूसाहेब अवचटे, महादेव कापगते , डॉ.मारोती बोरकर, रमेश मुंगुलमारे ,अंकित कापगते इतर मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य सेवा देणारे डॉक्टर अजयराव तुमसरे ,डॉक्टर दीपक चंदवानी ,डॉक्टर तारकेश्वरी गोबाडे ,डॉक्टर मितुल मिश्रा (दंतरोग चिकित्सक) डॉक्टर रुपेश बडवाईक यांनी सेवा दिली.