कमलसिंह यादव

प्रतिनिधी

पारशिवनी : – बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डिजे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत येत असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जवळ दोन अज्ञात आरोपीने त्याची दुचाकी अडवून तिघाना खाली पाडले. 

       तिघेही उठून पेट्रोल पंपकडे पळत असताना कल्पेशला पकडून त्याच्या पाठीवर,पोटावर,छातीवर, हातावर व गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्दयतेने हत्या केली होती.

         कल्पेशच्या हत्यारांना पकडण्यासाठी सर्व स्तरावरुन पोलिस विभागावर दबाव होता व एक प्रकारचे आव्हान सुध्दा होते.

        मात्र,सकरदरा पोलिस ठाण्यातंर्गत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने कल्पनेच्या दोन आरोपींना पकडण्यास अखेर काल यश आले.  

           १० सप्टेंबर २०२२ ला नागपुर येथील गणेश विसर्जनात डिजे वाजविण्याचा ऑडर करून डिजे मालक कल्पेश भगवान बावनकुळे वय ३० वर्ष व डिजे ऑपरेटर सुरज सुनिल ढोबळे वय २२ वर्ष व हेल्पर जितेंद्र रमेश ढोबळे वय २४ वर्ष हे तिघेही नागपुर वरून रात्री ११.३० वाजता घरी बनपुरीला दुचाकी क्र. एम.एच. ४९,बी.एल.५६२८ अँक्टीव्हाने परत येत असताना खून करण्याचा थरारक घटनाक्रम रात्रोच्या वेळेस घडला होता.

        कन्हान पोलीसानी फिर्यादी वडील भगवान राघोबाजी बावनकुळे यांचे तक्रारी अन्वये अज्ञात आरोपीं विरोधात अपराध क्र. ५२५/२२ कलम ३४१,३०२,३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला होता.

      डीजे मालक कल्पेश बावनकुळेची अज्ञात आरोपींंने निर्दयतेने हत्या केल्याने ही हत्या डिजे व्यवसायातुन केली असल्याचा प्राथमिक अंदाजावरून कन्हान पोलीसचे दोन पथक व स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिणचे पथक हत्येच्या आरोपींचा शोध करीत होते.

      तब्बल १३ दिवस झाल्यावर सकरदरा पोलीस स्टेशन अंतर्गत ताजबाग परिसरात काही दिवसा पुर्वी,शेख नौशादवर आरोपी आशिष उर्फ मोनु मनपिया व अन्य दोन आरोपीने रिवाल्वर तानुन जिवे मारण्याच्या पर्यंत केल्या प्रकरणी सकरदार पोलीसानी आशिष उर्फ मोनु मनपिया वय ३० वर्ष रा.भिलगाव,नागपुर व अन्य दोन आरोपीला अटक करून तपास सुरू असताना आशीष उर्फ मोनु मनपिया यांनी बोरडा रोड कांद्री कन्हान येथे कल्पेश बवनकुळे यांची हत्या केल्याचे कबुली दिल्याने,कन्हान पोलीसाना सकरदरा पोलिसांनी माहीती दिली.यातील आरोपी विक्की क्रिष्णा उके वय ३० वर्ष राह. जवाहर नगर कन्हान यास कन्हान पोलीसानी पहाटे सकाळी ताब्यात घेतले.याचबरोबर सकरदार पोलीसांच्या ताब्यात आशिष उर्फ मोनु मनपिया असल्याने,कल्पेश बावनकुळे यांच्या हत्येचे दोन आरोपींना अटक करण्यात आले असुन अन्य आरोपीचा व हत्येमागचा मुख्य सुत्रदार कोण? आणि हत्या करण्याचा उद्देश काय?या मुद्द्यान्वये कन्हान पोलीस तपास करित आहे.

      कन्हान पोलीसाना आरोपी विक्की उकेचा तपास करण्याकरिता (दि ३०) सप्टेंबर पर्यंत पीसीआर मिळाला आहे. 

         ही कार्यवाही सकरदरा पोलीस स्टेशनचे पी.आय.धनंजय पाटील,ए.पी.आय.आव्हाड,ए.पी.आय.कशोधन,व कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली,गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक कोकाटे व पथक,कन्हान थानेदार विलास काळे,सतीष मेश्राम,ए.पी.आय. प्रयाग फुलधेले,नरेश वरखडे,गणेश पाल,खुशाल रामटेके,मंगेश ढबाले,सम्राट वनपरेती,वैभव बोरपल्ली,अतिश मानवटकर आदी ने सक्रिय सहभाग घेत कामगिरी बजाविली आहे व योग्य तपास करणार आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com