धानोरा /भाविक करमनकर 

(9421916567)

 

 पेंढरी गट्टा अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायत मधील सचिव हे एका आठवड्यातून मंगळवार किंवा गुरुवारी फक्त आपली ड्युटी बजावत असतात बाकीचे दिवस पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मध्ये मीटिंग असल्याचे कारण देऊन ग्रामपंचायतच्या कामासाठी गैरहजर राहतात.या कारणास्तव येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांना कोणत्याही प्रकारचे दाखले हवे असल्यास सचिव अनुपस्थित असल्याने मिळण्यास गैरसोय होते. तसेच ग्रामस्थांची कामे रखड्रून पडली आहेत तसेच विकास कामांना खीळ बसली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे. सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील सचिव आणि स्थानिक पातळीवर वास्तव्यास राहून काम करण्याचे आदेश निर्गमित करावे. जेणेकरून ग्राम पातळीवरील कामास गती प्राप्त होऊन नागरिकाची कामे होण्यास अडचण होणार नाही. अशा प्रकारचे निवेदन गोंडवाना गोटुल सेनेचे गडचिरोली जिल्हा सचिव परमेश्वर शेषराव गावडे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांना देण्यात आली आहे.याची प्रतिलीपी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली खासदार व आमदार यांना देण्यात आली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com