उपसंपादक/ अशोक खंडारे
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोली च्या वतीने पत्रकार भवन येथे रिपब्लिकन जनचेतना अभियान दि.२८ सप्टेंबर ला आयोजित करण्यात आला आहे.
सदर अभियानाचे उद्घाटन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे हे करतील.अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष अशोक खंडारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभारीप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक निमगडे, सरचिटणीस घनश्याम फुसे, उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कोषाध्यक्ष प्रतिक डोर्लीकर, सचिव विशालचंद्र अलोणे, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन राजस खोब्रागडे आणि प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सुरेखाताई बारसागडे, प्रदेश सरचिटणीस प्राचार्य राजन बोरकर, पुनेश्वर दुधे, प्रल्हाद दुबे, बंडू मशाखेत्री, पत्रू सा.टेंभुर्ने, डॉ.हरीदास नंदेश्वर,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी जिल्ह्यातील अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे,क्रिष्णा चौधरी, दुर्योधन सहारे, तैलेश बांबोळे, अशोक खोब्रागडे, महिला आघाडी अध्यक्षा निता सहारे ज्योती उंदिरवाडे, वनमाला झाडे, अनिल बारसागडे, पुंजाराम जांभुळकर, केशवराव सामृतवार, प्रदिप भैसारे, प्रतीमा बोदेले, माधुरी शंभरकर, यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोली यांनी केले आहे.