शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबर मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासले पाहिजेत.:-आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन…

नीरा नरसिंहपुर दिनांक: 15

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 निमसाखर तालुका इंदापूर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झाला.

    शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासून शालेय क्रिडा स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

      निमसाखर ता.इंदापूर येथील एन.ई.एस.हायस्कूल येथे आज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला,यावेळी ते बोलत होते. 

      या प्रसंगी आ.भरणे यांनी त्यांच्या शालेय जिवनातील आठवणींना ऊजाळा देताना सांगितले की,पूर्वीच्या काळी शालेय जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच खेळाकडे सुद्धा एक उत्तम करिअर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन पालकांमध्ये होता.त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कुस्ती, खो-खो,हॉलीबॉल,कबड्डी तसेच ॲथलेटिक सारख्या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी घरच्यांकडून प्रोत्साहन मिळायचे.म्हणून त्याकाळी गावोगावी अनेक प्रतिभा संपन्न खेळाडू घडले गेले.

         परंतु आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण अक्षरशः हरवले असून मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची खंत यावेळी आमदार भरणे यांनी व्यक्त केली.

         तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लहानपणापासून विद्यार्थ्यांचा मातीशी संपर्क तुटला असल्यामुळे अलीकडच्या काळात आरोग्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम करणे हे क्रमप्राप्त बनले आहे.यासाठी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांनी नियमित व्यायाम करावा या भुमिकेतून आपण गावोगावच्या शाळांना खेळाचे साहित्य,क्रीडांगण व प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा प्रयत्न केला.असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी तालुक्यामध्ये मंजूर करून आणला असल्याने त्याचेच फलित म्हणून सध्या तालुक्यातील शेकडो विद्यार्थी खेळाडू विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश मिळवताना दिसत असल्याचे त्यांनी निक्षुन सांगितले.

        त्याचबरोबर एन.ई.एस.हायस्कूल ला आपण न मागता जवळपास २५ लाखांचा निधी दिला असून भविष्यात सुद्धा या संस्थेच्या भरभराटीसाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आ.भरणे यांनी दिली.तसेच आमदार भरणे यांनी विद्यार्थ्यांसोबत काही काळ कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला.

       यावेळी जेष्ठ नेते प्रतापराव पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,संस्थेचे चेअरमन राजेंद्र रणवरे,सचिव धनंजय रणवरे,नंदकुमार रणवरे,उपाध्यक्ष पप्पू रणवरे,क्रीडा अधिकारी महेश चावले,विजय रणवरे, पोपट कारंडे,युवराज म्हस्के,संतोष रणसिंग,विनोद रणसिंग,प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.