प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पस सोसायटी (ड्रीम) चंद्रपूरच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रीडा दिनानिमित्त दिनांक 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2024 या दिवसांमध्ये क्रीडा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचे उद्घाटन दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी हॉकी स्पर्धेने झाली. या पर्वाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता अनुताई दहेगावकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हॉकी प्रमोटर असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभाकर टोगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून हॉकी प्रमोटर असोसिएशनचे सचिव रुपेश सिंह चव्हाण, वरिष्ठ हॉकी खेळाडू निलेश ठाकरे, वरिष्ठ हॉकी खेळाडू बबलू सोनकर, ड्रीम चंद्रपूरचे कोषाध्यक्ष निलेश शेंडे मंचावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी भाषण देताना अनुताई दहेगावकर यांनी आपल्या जीवनात खेळाचे काय महत्त्व होते हे समजून सांगितले.
या स्पर्धेत शालेय गटात (U17) मुले मध्ये लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर, सेंट मेरी हायस्कूल दुर्गापुर, नारायणा विद्यालय पडोली व ड्रीम चंद्रपूर या संघाने सहभाग नोंदविला. यामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालयाने प्रथम तर ड्रीम चंद्रपूर ने द्वितीय स्थान पटकाविले. तसेच वरिष्ठ गटामध्ये टीम ब्लू तृतीय, टीम ग्रे द्वितीय व टीम पिंक ने विजेतेपद पटकाविले.
उद्या हॉकी पर्वाच्या दुसऱ्या दिवशी नेटबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा स्टेडियमवर करण्यात आले आहे. क्रीडा पर्वाचा तिसरा दिवस म्हणजे दिनांक 27 ऑगस्ट रोजी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा पर्वाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच दिनांक 28 तारखेला आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ, अंचलेश्वर वार्ड नं. 1 विद्यार्थी चौक चंद्रपूर येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच क्रीडा पर्वाचा शेवटचा दिवस म्हणजे 29 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या बाईक रॅलीमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ड्रीम चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे. त्यानंतर लगेच श्रमिक पत्रकार भवन येथे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी नोंदवलेल्या खेळाडूंचा व क्रीडा पर्वात आयोजित सर्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
हॉकी स्पर्धेला परीक्षक म्हणून अब्दुल रहेमान, बबन शेख, बबलू सोनकर होते.
या स्पर्धेच्या यशस्वीते करिता ड्रीम चंद्रपूरचे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष निलेश शेंडे, अमोल सदभैय्ये, सोनाली गावंडे, आयेशा खान, प्रियंका मंडल, श्रुती भारती, समृद्धी गेडाम, करिष्मा राजपूत, शर्वरी लभाणे, निधी झाडे, कोमल चौधरी, शुभम साखरे, शुभम पुणेकर, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसाकडे, आकाश इंगळे, सिद्धार्थ सूर्यवंशी, अपूर्व खुलसंगे, स्वप्निल घोंगडे आदीने परिश्रम केले.