युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यातील लेहगाव ( रेल्वे ) येथील एका युवकाचा पाय घसरून भुलेश्वरी नदीपात्रात वाहून गेल्याची घटना शुक्रवार (दि.23) सायंकाळी समोर आली आहे. दरम्यान तहसिलदार डॉ.रविंद्रकुमार कानडजे यांच्या सुचनेवरुन शनिवारी दुपारी जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन बचाव पथकच्या टिमला पाचारण करण्यात आले होते.
राहुल रमेश निताळे (वय.33) रा. खुर्चंणपूर-लेहगाव असे नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. घटनेच्यावेळी राहुल हा शेतशिवारात आपली गुरे-ढोरे चारण्यासाठी गेलेला होता.
परत सायंकाळी घरी परत येत असतांना पाय घसरल्याने तो भुलेश्वरी नदीपात्रात वाहून गेला. शनिवारी जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन बचाव पथकच्या वतीने नदीपात्रात शोध मोहीम सुरु असतांना ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
तसेच तलाठी योगेश डोळे,कोतवाल अमोल नवलकार दिवसभर तळ ठोकून होते. वुत्त लिहिस्तोवर नदीपात्रात शोधकार्य सुरु होते मात्र वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागलेला नव्हता. तर दुसरीकडे निताळे कुटुबीयांचा आक्रोश सुरु होता.