शिक्षणमहर्षी स्व.विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात शैक्षणिक इमारतीचे भूमिपूजन… 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

  आळंदी : गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणमहर्षी स्व.विलासराव तांबे शैक्षणिक संकुल नूतन शैक्षणिक इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. उपक्रमांतर्गत नूतन शैक्षणिक इमारतीचे भूमिपूजन संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

     शैक्षणिक इमारतीच्या भूमिपूजन वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल देशपांडे, भूपल मोरे, आरती वराडकर, सुनील सुपेकर, हरिहर नंदनवार, नरेंद्र देवस्थळी, संस्थेचे सचिव वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले, प्रशासकीय संचालक राजीव पाटील, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे तसेच डॉ. हंसराज थोरात, प्राचार्य सौ.शितल पाटील, मुख्याध्यापक अतुल पानसरे तसेच प्रा.डॉ.नितीन देव्हडराव, प्रा.डॉ.विकास शेंडे मान्यवर उपस्थित होते.

         संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी बँकेचा अतूट विश्वास आणि त्या अतूट विश्वासामुळे रोपट्याचे ३० वर्षात वटवृक्षामध्ये कसे रूपांतर झाले याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. राहुल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज बद्दल माहिती दिली व शैक्षणिक कर्ज मंजूर करून देण्यात सदैव तत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता वाघमारे व आभार प्रदर्शन डॉ.हंसराज थोरात यांनी केले.