प्रेम गावंडे
उपसंपादक
राजेंद्र रामटेके
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
चंद्रपूर : –
अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम याच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात नव्यानं संघटनात्मक बांधणी करण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
यामुळे संघाटत्मक बांधनी अनुषंगाने ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे चंद्रपूर नगरीत प्रथम आगमना निमित्त श्री.सुनिल दहेगांवकर यांच्या नेतृत्त्वात ठिक-ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे जंगी स्वागत पडोली चौक या ठिकाणी करण्यात आल्या नंतर बाईक रॅली हॉटेल एन.डी. पर्यंत काढण्यात आली. या बाईक रॅलीने मिरवणुक काढत असताना ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर हॉटेल ट्रायस्टार चौक तसेच हॉटेल एन.डी.येथे आगमन झाल्यावर जे.सी.बी तुन पुष्पवृष्टी करण्यात आली.
हॉटेल एन.डी. येथील सभागृहात ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आव्हान केले.जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघटन वाढविण्याकरिता सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात कमीत कमी दोन विधानसभा निवडणुक लढविण्याचे संकेत दिले.
सदर कार्यक्रमात श्री.रविंद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली,श्री.नानाभाऊ नाकाडे,श्री.सुनिल दहेगांवकर, श्री.युनुस शेख, श्री.ऋषिकांत पापडकर आदींनी जिल्ह्याभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
बल्लारपूर शहरातून तसेच चंद्रपूर व मूल येथून मोठ्या प्रमाणात लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये श्री. सुनिल दहेगांवकर यांच्या नेतृत्त्वात व ना. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
या संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन श्री. सुनिल दहेगांवकर यांनी केले होते.चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी संघटनात्मक आढावा बैठकीला हजेरी लावली होती.