तालुक्यातिल गरंडा शेत शिवारात बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा…

 

      कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 

पारशिवनी:-पारशिवनी तालुक्यातील गरंडा शेत शिवारात बिबट्याने दोन बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 

           गरंडा येथील शेतकरी वामनराव धोटे यांच्याकडे काही बकऱ्या आहेत. शया बकऱ्या त्यांचा शेतातील गोठ्यात रात्रीला बांधत असतात.आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने दोन बकऱ्यांचा फडशा पाडल्यानंतर, बकऱ्या मृतावस्थेत तेथेच पडुन राहिल्या. 

        नेहमीप्रमाणे शेतकरी वामनराव धोटे आज सकाळी आपल्या शेतात फेरफटका मारायला गेले असता.त्यांना दोन बकऱ्या मृतावस्थेत आढळल्या व बिबट्याचा त्या परीसरात पाऊलखुणाही त्यांना आढळल्या.

         या घटनेची माहिती त्यांनी लगेच वनपरीक्षेत्र कार्यालय पारशिवनी यांना कळविली.घटनेचा पंचनामा करण्याकरीता तत्काळ वनरक्षक पिल्लारे हे आपल्या सहकाऱ्यांनिशी पोहोचले व घटनेचा पंचनामा केला.

          शेतकरी वामनराव धोटे यांचे अंदाजीत विस हजाराच्या जवळपास नुकसान झाल्याचे कळते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मोबदला द्यावा अशी मागणी पिढीत शेतकरी व गावातील शेतकरी यांनी केली आहे.