दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पिंपरी : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभेचा नियोजित दौरा केला, विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेवून पक्ष बांधणी आणि संघटनेवर चर्चा केली.
आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेवून भोसरी विधानसभेतील समस्या आणि विकास कामे यावर चर्चा केली.पावसाचे दिवस असल्याने नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याने त्यांना पालिका रुग्णालयात वेळेत आणि चांगले उपचार मिळावेत, रुपीनगर तळवडे रेड झोन मध्ये येत असला तरी तेथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पालिकेकडून मिळाव्यात, शअशी सूचना आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली.
या भागात पालिका आरक्षित जागा ताब्यात घ्यावा व त्यांचा विकास जेणे करून नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल अशीही सूचना त्यांनी केली, भोसरी विधानसभेत समाविष्ट गावातील रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावावी,चिखली मध्ये नागरीकरण वाढले आहे वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडतात, ट्रॅफिकचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळे तेथील रस्त्यांचा विकास पालिकेने लवकर करावा, समस्त देशाचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाच्या कामाची माहिती त्यांनी घेतली व याच ठिकाणी संभाजी महाराज यांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला आत्मसात करता येईल याचे रेखाटन करता येईल का..? यावर लक्ष देण्याची सूचना देखील त्यांनी केली.
तसेच मोशी येथील हॉस्पिटल, बहुउद्देशीय स्टेडियम, नाशिक फाटा चांडोली कामाची माहिती पिंपरी चिंचवड मधील मराठी अनुदानित शाळांना प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सूट देण्यात यावी,अशा अनेक विषयांवर त्यांनी पालिका आयुक्तांन बरोबर चर्चा केली.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी राष्ट्रपती पुरस्कार झाला आहे मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आयुक्तांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या याप्रसंगी उपस्थित कामगार नेते मा इरफान भाई सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान शेठ पोखरकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाट, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव सर, उपशहर प्रमुख रामदास गाढवे,बळीराम जाधव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील पवार युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे विधानसभा संघटिका जानवी पवार वाहतूक आघाडी प्रमुख मानसिंगराव जाधव , सुरेश सूर्यवंशी, संदीप जाधव,राहुल पिंगळे, उपस्थित होते.