
रामदास ठुसे..
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :- तालुक्यातील हिवरा येथील जवळपास 50 विद्यार्थी शिक्षणासाठी साठगांव येथे येत असतात.मागील काही दिवसा पासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे हिवरा ते साठगांव रस्त्या वरील पूल तुटल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यास अडथडा निर्माण होत असून शैक्षणिक नुकसान देखील होत आहे.
तेव्हा हिवरा येथील सरपंच लाखे यांनी व उपसरपंच सौ.प्रिती दिडमुटे तसेच आंबोली ग्रा.प. सदस्य तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शुभम मंडपे,राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा काँग्रेसचे समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर यांच्या उपस्थितीत चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर गाडगे यांना बस सुरू करण्याची मागणी व निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या एसटी समस्या बाबत बसस्थानक आगार प्रमुखाची भेट घेऊन बस सुरु करण्याची मागणी विद्यार्थांनी केली.
मात्र,डेपो मॅनेजर यांनी बस सुरु करण्यासाठी चंद्रपूर येथून परवागी घ्यावी लागेल.नंतर रुड ठरविण्यासाठी चंद्रपूर वरून बस येणार त्यानंतर बस सुरु होणार असे सांगितले.
तद्वतच या साठी 10 ते 15 दिवस लागणार असे डेपो मॅनेजर यांनी सांगितल्याने यात विद्यार्थ्यांचे नुकसान होईल आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता डॉ.सतीश भाऊ वारजुकर यांनी जो पर्यंत बस सुरु होणार नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांसाठी स्वतःकडून गाडीची व्यवस्था करून देणारे असे विद्यार्थींना सांगितले.
त्याबद्दल विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सतीशभाऊ यांचे आभार व्यक्त केले.