जीव गेल्यावर लक्ष द्याल काय? — नयाकुंड पुलावर चे रस्त्यावरील खड्डे बुजवा,अन्यथा रस्ता रोको आंदोलन… — रामटेक विधानसभा युवक काँग्रेस तर्फे तहसिलदाराना दिले निवेदन…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 पारशिवनी:- 

      पारशिवनी तहसिल कार्यालय येथे मंगलवार दिनांक 23/07/2024 रोजी रामटेक विधानसभा क्षेत्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष निखिल पाटिल यांच्या नेतृत्वात तहसीलदार पारशिवनी यांना निवेदन देण्यात आले. 

          दिलेल्या निवेदनात आमडी ते पारशिवनी मार्गावरील नयाकुंड पुलावर्ती मोठं-मोठे खड्डे पडले आहेत,या खड्ड्यान मुळे जीव हानी नाकारता येत नाही.यामुळे सदर रस्त्यावरील खड्डे चार दिवसाच्या आत बुजवावे,अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा रामटेक विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे कार्यकर्ता तर्फे देण्यात आला आहे.

        या प्रसंगी निवेदन देतांना प्रामुख्याने सचिन सोमकुवर ग्रामपंचायत सदस्य भगिमहारी,आशिष ठाकरे,प्रतीक ठाकरे,श्रीजित चंदनकर,ऋषिकेश गेटमे,शुभम वाघमारे,मयुर साबरे,प्रज्वल मेश्राम आदी सह रामटेक विधान सभा क्षेत्रातील युवक कार्यकर्ता प्रामुखाने निवेदन देतांनी उपस्थित होते…