खल्लार हायस्कुल येथे शिक्षण सप्ताहास प्रारंभ…

युवराज डोंगरे

    उपसंपादक

खल्लार श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित खल्लार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खल्लार येथे शासन उपक्रमा अंतर्गत शिक्षण सप्ताह कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
           

        यानिमित्य विद्यालयात क्रिडा स्पर्धा व वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला गजला खान उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प .अमरावती, कु. कांचन दुधे जिल्हा समन्वयक अमरावती, कु. ममता गुजर विषय तज्ञ पंचायत समिती दर्यापूर, अशोक बावनेर केंद्रप्रमुख यांनी भेट दिली असता मैदानावर खेळणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांची भेट घे ऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. तसेच या भेटीदरम्यान विद्यालयांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

            या कार्यक्रमाला श्री मधुसूदन धाबे आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा सदस्य शाळा समिती, खल्लार, डी.आर .नवरे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मैदानी व वर्ग खोल्यांमधील खेळ बघून समाधान व्यक्त केले.