वृक्षारोपण ही जन चळवळ होणे काळाची गरज :- प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे  — समर्थ महाविद्यालया तर्फे गाव शिवारात वृक्षारोपण अभिनव उपक्रम…

   चेतक हत्तिमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

 लाखनी – स्थानिक समर्थ महाविद्यालया मार्फत वेळोवेळी समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. नुकताच असह्य उष्णतेचा उन्हाळा संपून पावसाळ्याला प्रारंभ झाल्याच्या पार्शवभूमीवर राष्ट्रीय छात्र सेना व रासेयो ने पुढाकार घेऊन वृक्षारोपण ही जन चळवळ होण्यासाठी गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष वृक्षारोपण करून त्यात गावकऱ्यांना सहभागी करून वृक्षारोपण बाबत जनजागृती करण्यासाठी सावरी येथील गावशिवारात जाऊन आंबा ,जांभूळ , पिंपळ , बेल अश्या वृक्षांचे गावकर्यांच्या मदतीने व सहभागाने वृक्षारोपण केले तसेच सर्वांच्या मदतीने झाडे वाचविण्याचा,वाढविण्याचा संकल्प केला.

            याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, सावरीचे माजी सरपंच भागवत नान्हे, रासेयो अधिकारी प्रा धनंजय गिऱ्हेपूजे कॅपटन बी.के.रामटेके, डॉ. सुरेश बन्स्पाल,डॉ.बंडू चौधरी ,प्रा. लालचंद मेश्राम, प्रा. युवराज जाम्भूलकर ,श्याम पंचवटे व गावकरी ,तसेच राष्ट्रीय छात्र सेना व रासेयोचे विद्यार्थी उपस्थित होते.

          याप्रसंगी वर्तमान काळात जगाला भेडसवनाऱ्या ज्या समस्या आहेत त्यात वाढते उष्णतामान एक गंभीर समस्या म्हणून पुढे आली आहे. मागच्या उन्हाळ्यात आतापर्यंतच्या सर्वात जास्त बळी उष्माघाताने गेले आहेत त्यामुळे या वाढत्या समस्येला समूळ नष्ट करावयाचे असल्यास प्रत्येकाने वृक्ष लावणे त्याचे संवर्धन करणे काळाची गरज असून वृक्षारोपण ही जन चळवळ होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी केले.

           गाव शिवारात वृक्षारोपण करतांना बोलत होते. सावरी ग्रामचे माजी सरपंच भागवत नान्हे यांनी वृक्षारोपण करून आपले आयुष्य सार्थकी लावण्याचे आवाहन केले तसेच सावरी गावकरी या अभियानात हिरीरीने भाग घेतील असे आश्वासन दिले. प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख बी.के.रामटेके आभार रासेयो अधिकारी प्रा.धनंजय गिऱ्हेपूजे यांनी मानले.