आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या रणसंग्रामाची मोर्चेबांधणी सुरु… — भाजप कडुन कृष्णा गजबे तर कॉंग्रेस कडुन रामदास मसराम सह अनेकांचे प्रयत्न सुरु…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- आरमोरी विधानसभा निवडनुकीचे रणसंग्राम आता अगदी जवळ आले असुन ऑगष्ट महिण्याच्या शेवटी आचार संहितेचे बिगुल वाजनार असुन आता हळुहळु इच्छुक उमेदवारांनी आपली प्रबळ दावेदारी सिद्ध करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजप व महायुती कडुन विद्यमान आमदार कृष्णा गजबे तर कॉंग्रेस व महाविकास आघाडी कडुन रामदास मसराम यांचेसह माजी आमदार आनंदराव गेडाम, कॉंग्रेस आदिवासी सेल चे जिल्हाध्यक्ष छगन सेडमाके, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे यांचेसह इतर इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी ची दावेदारी सिद्ध करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरु केले असुन महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना उबाठा गट कोणती भुमिका घेते यावरही येत्या निवडणुकीचे चित्र अवलंबुन असले, तरी मुख्य लढत मात्र भाजप चे उमेदवार कृष्णा गजबे आणि कॉंग्रेस चे रामदास मसराम यांच्यातच होत असल्याचे चित्र निर्माण झाले असुन आनंदराव गेडाम यांनी ही आपल्या उमेदवारी साठी हालचाली सुरु केल्या असल्याचे दिसुन येत आहे.

             लोकसभा निवणुकीत कॉंग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने विधानसभा निवणुकीत हे यश टिकवुन ठेवण्यासाठी या विधानसभेत प्रभाव निर्माण करण्यासाठी तिकिट साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण करुन कॉंग्रेस पक्षाचा प्रचार घराघरापर्यंत करुन सर्वात प्रभावी कोण? याची चाचपणी करुणच तिकिट वाटप चा निर्णय घेतल्या जाणार असुन या पक्षाची तिकिट मिळावी यासाठी भाऊगर्दी करणारे सर्वच संभाव्य उमेदवार तन, मन, धनाने कामाला लागले असले तरी यात रामदास मसराम, आनंदराव गेडाम व छगन सडमाके यांनी आपला जनसंपर्क वाढविला असुन कॉंग्रेस चे वरिष्ठ नेते काय सुचना देतात? याकडे वामनराव सावसाकडे लक्ष देवुन आहेत या नावानंतरही नविन इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असुन शिवसेना उबाठा गट, महाविकास आघाडी चा घटक पक्ष असला तरी यावेळी आरमोरी विधानसभेची दावेदारी मिळावी यासाठी दबावगट तयार करतांना दिसत आहे असे असले तरी गेल्या २ वर्षापासुन कॉंग्रेस पक्षासाठी सातत्याने काम करणारे या विधानसभा क्षेत्रात भुमीपुत्र म्हणून ओळख निर्माण करणारे शेतकरी आंदोलनाचे प्रणेते रामदास मसराम हे इतर उमेदवारांच्या तुलनेत कितीतरी पटीने पुढे असुन त्यांनी जि.प. शिक्षकाच्या नौकरीचा राजीनामा देवुन पुर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढविण्याची तयारी दर्शवत कॉंग्रेस च्या सर्वच कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन तन मन धनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा सपाटा सुरु केला.

     आरमोरी विधानसभा क्षेत्रात आरोग्य शिबिरीचे आयोजन करणे, कॉंग्रेसच्या कार्यक्रमात भोजनाची व्यवस्था करणे असे अनेक उपक्रमे सुरु केली असुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपली ओळख निर्माण करुन एक प्रकारचे आव्हान उभे केले. गरज जिथे आम्ही तिथे ही भुमिका घेत आदिवासी सेल चे जिल्हाध्यक्ष छगन सडमाके यांनी ही गरजुंना साड्या वाटप विद्यार्थ्यांना नोटबुक, वह्या पुस्तके, ब्लँकेट ताळपत्री, आर्थिक मदत देवुन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करुन पक्ष जर तिकिट देत असेल तरच आपण निवडनुक लढणार अशी भुमिका घेतली आहे. या निवणुकीत प्रभाव पाडण्याची क्षमता असलेले आनंदराव गेडाम हे दोन टर्म आमदार राहिले असुन त्यांना सुद्धा दोन टर्म पराभवाचा सामना करावा लागला असतांना पाचव्यांदा तिकिट मिळावी यासाठी प्रयत्नरत आहेत. अतिशय सावध पवित्रा घेत वामनराव सावसाकडे पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची प्रतिक्षा करतांना दिसत आहेत.

कृष्णा गजबे यांची बाजु अजुनही भक्कमच

     सलग दोन टर्म आनंदराव गेडाम यांचा पराभव करीत आमदार बनलेले कृष्णा गजबे यांचा शांत व मृदुभाषी स्वभाव जनसामान्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला असुन १० वर्षाच्या आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे करित सर्वच सामाजिक, धार्मीक कार्यात सहभागी होणे लग्न समारंभ मय्यती, तेरव्या, बारसे , वाढदिवसे यांत उपस्थित राहुन पारिवारिक संबंध अत्यंत दृढ निर्माण करुन सहज उपलब्ध होणारा आमदार म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. लोकसभा निवणुकीत भाजप उमेदवार माजी खासदार अशोक नेते यांना खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांचेपेक्षा ३३ हजार मते कमी मिळाल्याने कॉंग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले तरी १० वर्षे खासदार असतांना विकासाकडे लक्ष न देणे, सहज उपलब्ध न होणे, कार्यकर्त्यांशी संवादाचा अभाव अशी अनेक कारणे नेते यांच्या पराभवाला कारणीभुत ठरली.

कृष्णाभाऊंच्या रथाचे सारथी अनेक

      मृदभाषी कृष्णाभाऊंच्या उमेदवारीला विजयात परिवर्तित करण्यासाठी अरविंद सावकार पोरेड्डीवार, किसन नागदेवे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, मोतीलाल कुकरेजा, राजु जेठानी, शालु दंडवते, रविंन्द्र गोटेफोडे, चांगदेव फाये, नाजुक पुराम, यांचेसह विधानसभेतील शेकडो भाजपचे प्रभावी नेते व कार्यकर्ते असल्याने कृष्णाभाऊंचा विजय रथ रोखने कॉंग्रेस ला कठिण असले तरी आदिवासी समाजाचे परंपरागत कॉंग्रेस पक्षाचे गट्ठा मते व ओबिसी संघटनेच्या माध्यमातुन या समाजात आगळी वेगळी निर्माण करणारे आणि शिक्षक संघटनेचा पाठिंबा असलेले रामदास मसराम हे आव्हान पेलु शकतात, असे कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांकडुन बोलले जात आहे. लोकसभा निवणुकीत आरक्षण व संविधान हा आंबेडकरी समाजासाठी करा किंवा मरा असा मुद्दा असल्याने या समाजाने आपल्या जिव्हाळ्याचा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टीला बगल देत गट्ठा मते कॉंग्रेसला दिल्याने डॉ. नामदेवराव किरसान यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला मात्र विधानसभा निवणुकीत हा समाज कोणाच्या पाठिशी उभा राहतो यावरही बरेच काही अवलंबुन आहे. 

मुस्लिम समाजाच्या मतांवरही कृष्णा गजबे यांचे प्रभुत्व   

      संपुर्ण विधान सभेत ५ हजाराचे जवळपास मतदार असलेल्या मुस्लिम समाजावरही आमदार कृष्णा गजबे यांची घट्ट पकड असुन ३५ हजार चे वर असलेल्या आंबेडकरी समाजात ही वैयक्तिक संबंधाचा प्रभाव असल्याने विजय खेचुन आणणे सोपे असले तरी रामदास मसराम यांचा स्वभावही मनमिळावु मृदभाषी असल्याने आदिवासी समाज ओबिसी समाज व मुस्लिमांसह आंबेडकरी समाजात ओळख असल्याने आव्हान पेलण्यात इतर उमेदवारांच्या तुलनेत सरस ठरतील असे असले तरी निवणुकीच्या रणांगनात शेवटच्या क्षणापर्यंत काय बदल घडून येईल हे सध्यातरी सांगणे कठिण आहे.