सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
ग्राम विकासाचा मुख्य दुवा गावातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे.पाथरी ग्रामपंचायत मध्ये एकूण 11 सदसिय समिती आहे.ग्राम विकासाच्या बाबतीत उपसरपंच यांनी पुढाकार घेऊन अनेक विकास कामे खेचून आणली व जवळपास 4 कोटी चे विकास कामे सुद्धा पूर्ण झालेत.
उपसरपंच यांच्या कामाची गावात वाह वाह होत असून अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार सुद्धा झालेले आहेत.
उपसरपंच यांना मासीक सभेचा नोटीस न दिल्यामुळे सरपंच सौं.अनिता ठीकरे आणि ग्रामसेवक यांना विकास कामा एवजी काय अपेक्षित आहे हे कळायला मार्ग नाही.
वैयक्तिक स्वार्था मूळे पाथरी नगरीत सुरु असलेल्या विकास कामाला सध्या ग्रहण लागले असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सर्वत्र सुरू आहे.
अशातच सरपंच तथा सचिव यांच्या संगणमताने वैयक्तिक स्वार्थासाठी ग्रामपंचायतच्या कुठल्याही कामाची माहिती उपसरपंच यांना होऊ नये,याकरिता मासिक सभेचे नोटीस सुद्धा देण्यास टाळाटाळ केली असून या महिन्याच्या मासिक सभेचे नोटीस उपसरपंच यांना न दिल्याची माहिती उघळकीस आलेली आहे.
यावर उपसरपंच श्री प्रफुल तुम्मे यांना विचारणा केली असता सरपंच तथा सचिव यांना जाब विचारणार असून वरिष्ठ कार्यालय येथे तक्रार करणार असल्याचे सांगितले.