सुनील नंदनवार
शहर प्रतिनिधी दखल न्युज भारत
आरमोरी
दिनांक १६ जूनला आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील रहिवासी वासुदेव मेश्राम याचा नरभक्षक वाघाने बळी घेतला होता. त्यामुळे घरातील पालनकर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. मृतक वासुदेवच्या कुटुंबात त्याची आई पार्वता ,पत्नी शीतल,मुलगी टीनु, मुलगा मोहित असा बराच आप्त परिवार आहे.आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी इंजेवारी येथे जाऊन मृतक वासुदेवच्या कटुंबाची भेट घेऊन सांत्वना केली. मृतक वासुदेव मेश्राम यांचा कुटुंब भूमिहीन असून, यावेळी आ.कृष्णा गजबे यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. तसेच मृतक वासुदेवच्या कुटुंबाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.गजबे यांनी सांत्वनापर भेटीत दिली.
यावेळी आ.कृष्णा गजबे यांचे सोबत कृषी उत्पन बाजार समिती आरमोरीचे उपसभापती ईश्वर पासेवार,भाजपा आरमोरी तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, इंजेवारी ग्रा.प.चे उपसरपंच मंगेश पासेवार, कंत्राटदार अमर बोबाटे,ग्रा.प.सदस्य चुडाराम पात्रीकर,संजयसिंग डांगी, मोरेश्वर जुमनाके, ग्रा.प.सदस्या सविता दाणे, मुख्याध्यापक वासुदेव चिळांगे, चेतन पात्रीकर, वसंता पात्रीकर, श्रीरंग मेश्राम,सुधाकर दाणे, तसेच इंजेवारी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.