सदाशिव माकडे

संपर्क 8275228020

 

अहेरी ( गडचिरोली) : अहेरी उपविभागातील वेलगुरु नवेगाव परिसर हा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर आहे. परिसरात मागील अनेक वर्षापासून वीज वितरण कंपनी द्वारे जनतेची थट्टा चालवलेली असल्याचे वीज वितरण कंपनीच्या कामावरून निदर्शनास येत आहे. सदर परिसर हा अहेरी तालुक्यातील असला तरी वीजपुरवठा हा आष्टी वरून मुलचेरा, सुंदरनगर, गोमनी परिसरातून आहे. परिसरात अनेक गावे असून हा प्रवाह अतिशय घनदाट अशा जंगली भागातून आहे व सदर परिसर विज वाहिनीच्या शेवटच्या टोकावर असल्याने सर्वात जास्त फटका वेलगुर नवेगाव ह्या परिसरातील लोकांना बसत आहे.

महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे व निष्काळजीपणाने योग्य देखभाल दुरुस्ती अभावी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यावर परिसरातील वीजपुरवठा तासनतास नाही तर अनेक दिवस बंद राहत आहे. सध्या पावसाचे नक्षत्र सुरु असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शेतीची कामे खंडीत वीजपुरवठा यामुळे आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने ठंप पडलेली आहेत. वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठयाने नागरिकांचा जिव मेटाकुटीस आला असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर परिसरातील जनता रोस व्यक्त करीत आहेत. संबंधित अधिकारी कर्मचारी यांना खंडीत वीज पुरवठा याविषयी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वीज पुरवठा खंडित झाल्याबरोबर त्यांचा मोबाईल सुध्दा बंद दाखवत असतो. अनावधानाने संपर्क झाला तर वरतूनच ब्रेकडाऊन असल्याचे सांगितले जाते परंतु परिसरातील जनतेकडून वीज बिलाचे वसुली करण्यास वारंवार तगादा लावला जातो मग वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाही? का ?लोकांच्या भावनांशी खेळल्या जात आहे. का ? सदर अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती संबंधित समस्या सोडविण्यासाठी नाही. परिसरातील जनतेच्या समस्येशी काहीही सोयर सुतक नाही का? असे एक नाही तर अनेक प्रश्न जनतेच्यासमोर निर्माण होत आहेत. सदर परिसरातील अधिकारी, कर्मचारी वा पदाधिकारी हे आपल्या परिसरातील समस्या संबंधाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचे चर्चा करीत नसावे किंवा त्यांच्या निदर्शनास आणून देत नसावेत ज्यामुळे मागील अनेक वर्षापासून सदर समस्या जैसे थे आहे. परिसरामध्ये मुख्यतः दोन ग्रामपंचायती असून दोन्ही ग्रामपंचायती मध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत परंतु काही लोकप्रतिनिधी वगळता सदर परिसरातील लोकप्रतिनिधी हे सुद्धा सदर समस्या सोडविण्यासाठी कुचकामी ठरत असल्याचे लोकांकडून बोलल्या जात आहे.

             वेलगुर ग्रामपंचायतचे उपसरपंच उमेशभाऊ मोहुर्ले यांच्याशी वारंवार होणारा खंडीत वीजपुरवठा या प्रश्नाला छेडले असता त्यांनी अतिशय तीव्र स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करीत त्यात त्यांनी म्हटले की आजपर्यंत अनेकदा वीज वितरण कार्यालय मुलचेरा येथे निवेदन सादर करण्यात आलेली आहेत परंतु सदर कार्यालयाकडून वारंवार त्याची अवहेलना करण्यात येत आहे. अनेकदा संबंधित कार्यालयासमोर आंदोलन सुध्दा करण्यात आलीत त्यात काही वरिष्ठ अधिकारी यांनी सदर परिसराकरीता स्वतंत्र पावरस्टेशन मंजुरीचे आश्वासन देत मध्यस्थी केलेली होती, त्याला एक वर्षाचा कालावधी लोटून गेला परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनीचा चालढकलपणा दिसून येत आहे. त्यामुळे आज पर्यंत सदर समस्या सोडविण्या संबंधाने आम्हाला यश आले नाहीत म्हणून आम्ही इथेच न थांबता आमचे प्रयत्न चालूच ठेवणार आहोत. तसेच यापुढे अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असून प्रसंगी उपोषणाला सुद्धा बसण्याचा इशारा प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिलेला आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com