पारशिवनी :- तालुका तिल पो.स्टे . पारशिवनी अंतर्गत ०१ कि.मी अंतरावरील मौजा बारई तलाव अमराई पारशिवनी येथे बुधवार दिनांक २२. जुन . २२ दुपारी चे ०३/०० वा . दरम्यान हरीभाउ गणपत धुरई , वय ६४ वर्ष रा . प्रभाग क्र . ६ पारशिवनी यांची प्रकृती खराब राहात असल्याने त्यांनी बारई तलाव अमराई येथे वडाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्यानंतर ते मृत अवस्थेत आढळून आले . सदर प्रकरणी तक्रारदार – सतिश विष्णुजी धुरई , वय ४० वर्ष , रा . प्रभाग क्र . ६ पारशिवनी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे . पारशिवनी येथे कलम १७४ जाफौ . कायद्यान्वये मर्ग नोंद केलेला असून पुढील तपास पोलिस हवालदार जयंत शेरेकर हे करीत आहे .