दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार खेड तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदी आळंदी येथील रोहीदास तापकीर यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
रोहीदास तापकीर हे आळंदी येथील शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, आळंदी नगरपरिषदेचे शिवसेनेचे पहिले नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे तसेच आळंदी शहर शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून त्यांनी निष्ठेने काम केले आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असतानाही रोहीदास तापकीर हे उध्दव ठाकरे यांच्या बरोबर राहीले आहेत, तापकीर यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रोहीदास तापकीर यांची उपतालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी तापकीर यांनी निवडीनंतर सांगितले की पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मी निष्ठेने पार पाडेल, तसेच येत्या काळात आळंदी नगरपरीषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.