उमा नदीच्या पात्रातून सातत्याने रेती तस्करी… — तस्करांच्या मुसक्या कोण आवळणार…? — महशुल विभाग प्रचंड दबावात? — वंचितचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे करणार आंदोलन….

 

 दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका 

          रेती व मुरुम गौण खनिजाच्या अवैध उत्खननाकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष हे सांगून जाते की चिमूर तालुकातंर्गत महसूल विभाग अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर राजकीय शक्तींचा प्रचंड दबाव आहे.

            राजकीय शक्तींचा प्रचंड दबाव नसता तर चिमूरच्या महसूल विभाग अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रेती व मुरुमांच्या अवैध उत्खननाकडे लक्ष देत तस्करांच्या मुसक्या वेळीच आवळल्या असत्या.

 

            नेरी लगत असलेल्या उमा नदीच्या पात्रातून दिवसरात्रं सातत्याने अवैधरित्या रेतीचा(वाळूची) उपसा वाळू तस्करांद्वारे होतो आहे.मात्र उमा नदीच्या पात्रातून होणाऱ्या वाळू उपसाकडे चिमूर तहसीलचे तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी व संबंधित सर्व तलाठी कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत.

          याचबरोबर चिमूर तालुकातंर्गत मुरुमांचे होणारे अवैध उत्खनन डोकेदुखी ठरत आहे.असे असताना संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी आॅफीसच्या टेबलावरुनच मुरुम उत्खनन संबधाने देखरेख करतात की काय असे वाटायला लागले आहे.आणि यांना अवैध मुरुम उत्खननासी काही संबंध नाही अशाच प्रकारची त्यांची कृती व कार्यपध्दत जगजाहीर आहे.

          बिनधास्त होणाऱ्या वाळू व मुरुमांच्या अवैध उत्खननाकडे जाणिवपूर्वक होणारे दुर्लक्ष म्हणजे काही राजकीय व्यक्तींचे व तस्करांचे,संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसी व कर्मचाऱ्यांसी साटेलोटे असल्याचे नाकारता येत नाही.

          यामुळे चिमूर तालुक्यातील अवैध उत्खननाची जिल्हा स्तरावरून सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

            उमा नदीच्या पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीकडे चिमूरच्या महशुल विभाग प्रमुखांनी तात्काळ लक्ष केंद्रित करुन तस्करांच्या मुसक्या वेळीच आवळल्या नाही तर बहुजन वंचित आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचितचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांनी दिला आहे.