विशेष स्मृतिदिनाचे महत्व जाणून न घेतल्यास परिणाम व प्रभाव पुढे येणारच? — मटन,धर्म व जाती परंपरा,शिध्दांत,सवयी,धोरणे, अंमलबजावणी,हत्या,इच्छा,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,कार्यपद्धत आणि शाब्दिक मदत… — बौध्दिक दिवाळखोर?

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

        भारत देशात अनेक धर्म आहेत व सर्व धर्मातंर्गत हजारो जाती,पोटजाती आहेत.तद्वतच प्रदेश,प्रांत व विभागांतर्गत अनेक बोलीभाषा आहेत,खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत व सदासर्वदा राहणार आहेत.

       आपापल्या धर्माच्या विचारानुसार जातीच्या,पोटजातीच्या माध्यमातून रितीरिवाजा  अन्वये दैनंदिन व कार्यक्रमानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यपद्धती सुरु आहेत व रहनसहन त्यानुसार ठरलेल्या आहेत.

        ही झाली व्यवस्थे नुसार देशातील नागरिकांची दीर्घकालीन वाटचाल.काळाच्या ओघात काही बदल सुध्दा झालेले आहेतच. 

          मात्र,विशेष स्मृतिदिनाचे महत्व अनन्यसाधारण असते आणि तो दिवस सर्वांसाठी अतिशय बोलका,प्रेरक आणि सर्व कार्यभाव व सर्व कार्यभाग प्रसंगातील दीर्घकालीन स्मरणांचा असतो.

            मोठाल्या बाता करण्यापेक्षा चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत कार्यभाव व कार्यभाग विचारात घेतले तरी पुरेसे आहे.

            योग्य व सुयोग्य रीतिरिवाज नुसार सद्वविवेक बुध्दीला अनुसरून चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत नागरिकांना साधा प्रश्न करतो आहे,”स्वत:चे मायबाप मेल्यावर,” मेले तर गेले,..”आता काय करायचे त्यांच्या मरण दिनाचे व त्यांचे? असे म्हणून त्यांचे विस्मरण करणार काय?

          याचबरोबर त्यांच्या मरण दिनाला अनुसरून स्वतःला मोठ बनवणारा किंवा मोठं मानुन घेणारा कुठल्याही कार्यप्रसंगानुरुप कार्यक्रमाचे आयोजन कराल व लोकांच्या आवडीनिवडी नुसार लोक जे खातील ते अन्नपदार्थ खाऊ घालाल तर यात कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांचा काय दोष?

          याचबरोबर समोर असलेल्या खाद्य  पदार्थांपैकी त्यांना आवडतात ते खाद्य पदार्थ आपल्या इच्छेनुसार तर खाणारच…

             महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की,” स्मृतिदिन हा महत्वपूर्ण नेत्यांच्या असो की आईबाबांचा असो,खरोखरच या स्मृतिदिनानिमित्त बाह्य किंवा प्रत्यक्ष हत्या अंतर्गत एखाद्या प्राण्यांचे मांसाहारी जेवण देण्याची परंपरा आपल्या भागात सुरू आहे काय?

          आपण ज्यांना जिवंतपणी व मृत्यू नंतरही मानतो ते सामाजिक आणि राजकीय नेतागण,संत-महापुरुष व आईबाबा आपल्यासाठी निरंतर काळात आधार असतात व आपल्या उज्ज्वल भविष्यासाचे ते सदैव मार्गदाता असतात.यामुळे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या विविध प्रकारच्या लोकहितार्थ किंवा वैयक्तिक कार्यभागाची,कार्यभावाची आठवण म्हणून कमीतकमी त्यांच्या जन्म व मृत्यू दिनी कोणत्याही स्थितीत बाह्य किंवा प्रत्यक्ष हत्या  करणारे कर्तव्य आपण पार पाडत नाही,एवढी तर सद्वविवेक बुध्दी आपल्याला आहेच..

       वरील प्रमाणे विज्ञान,गीता व शास्त्राचे कारण पुढे आणले तर अनेक गुंतागुंतीचे मुद्दे समोर येतात.

        कारण खडसंगी-मासळ येथे माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त २१ में ला पार पडलेल्या काॅंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात एकाच धर्माचे व एकाच जातीचे लोक नसतीलच…

           तद्वतच भारत देशाचे माजी प्रधानमंत्री व काॅंग्रेस पक्षाचे तात्कालीन तारणहार स्व.राजीव गांधी यांची हत्या अतिशय क्रुर व निर्दयीपणे करण्यात आली होती याचे भान जर काॅंग्रेस पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना असेल तर ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हत्या अंतर्गत मटनाचे जेवण,”त्यांच्या स्मृती दिनानिमित्त,लोकांना निश्चितच देणार नाहीत.

         आता सवयींवर येवू या.. तात्कालीन धर्मशास्त्राच्या नियमानुसार भारत देशात वेळोवेळी खाणपाणाच्या वेगवेगळ्या सवयी लागल्यात किंवा लावण्यात आल्यात.

        आजही नियमानुसार खाणपाणाच्या सवयी त्याच पध्दतीच्या जुन्या आहेत व काही नवीन आहेत.दारु,इंग्लिश दारु,बियर(नाव माहीत नसलेले सर्व प्रकारचे मद्य),आणि काही प्राण्यांचे मांसाहार करणारी रुढी परंपरा.. तद्वतच त़बाखूजन्य मादक पदार्थांचे दीर्घकालीन शेवन,..

          “वैयक्तिक आयुष्यात जगताना तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो पण तोही कायद्यानुसारच!,”हे सुद्धा विसरून चालणार नाही.(या बातमी प्रसंगाने कायद्याच्या खोलात सुद्धा मला जाता येणार नाही..)

***

       हत्या..

👇👇

      एखाद्या प्रसंगानुरूप कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मांसाहारी जेवण देण्याची मानसिकता मनात आणणे म्हणजेच हत्या करण्याचे चित्त उत्पन्न होणे होय.

        हत्या प्रत्यक्ष केलेली असो की अप्रत्यक्ष केलेली असो ती क्रूर प्रकारातील हत्याच ठरते व सदर हत्यातंर्गत संबंधित व्यक्ती आणि इतर सर्व व्यक्ती हत्यारे ठरतात.. कारण तुम्ही कुणालाही मांसाहारी जेवण देण्याचे चित्त मनात उत्पन्न केले व त्यानुसार हत्या करण्यासाठी दुसऱ्याला प्रेरीत केले किंवा सांगितले तरी तुम्ही हत्याचे प्रमुख सुत्रधार ठरताय,हे कसे काय नाकारुन चालणार?.

       दुसऱ्याच्या जिवाच्या हत्येतून निर्माण झालेले खाद्य मनुष्य मात्रांच्या अनेक गुणांना ऱ्हास करतात.तद्वतच मांसाहार करणे ही कृतीच तमप्रधान मानली आहे.

          तद्वतच अशा मांसाहारातील तमोगुणी लहरींच्या प्रभावाने देहातील सत्व गुणांचा ऱ्हास होतो.परिणामी चांगल्या विचारांचा ऱ्हास होऊन अविचाराने युक्त अशा हिंसक विचारांचा उदय होऊ शकतो.या अविचारांच्या प्रभावाने मनुष्य एखादे दुष्कृत्य करण्यास शिध्द होतोय.म्हणून तमोगुणाने युक्त असा आहार टाळावा,असे सुध्दा अनेक संत सांगून गेले व काही धर्म ग्रंथही सांगतात.

        आणि पशूंची हत्या तर क्रूर कार्यपद्धतीत मोडते.कुठल्याही प्रकारची दयामाया न दाखवता शस्त्राने करण्यात येणाऱ्या पशू हत्येला अत्यंत खालच्या स्तरावरील अकुशल कर्म म्हणतात.

        मग अकुशल कर्मातंर्गत हत्येला चांगला कार्यभाग समजून कार्यकर्त्यांना मटनाचे जेवण देणे योग्य आहे काय?(केवळ स्मृतिदिनानिमित्त..)

***

मांसाहार व मनुष्याच्या आरोग्याचा संबंध…

👇👇

         वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आहाराकरता एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते,त्या वेळी मृत्यू भयाने त्या प्राण्याच्या शरीरात अॅड्रीनल आणि नाॅरअॅड्रीनल हे विषारी रस निर्माण होतात.

         पशुपक्ष्यांत ट्रिचीनाॅसिस या रोगाचे ट्रिचिनेला नामक कृमी असतात.मास खाल्ले की,हे कृमी माणसाच्या आतड्यात मोठ्या प्रमाणात अंडी घालतात.अंड्यातून निघालेले कृमी रक्तप्रवाहात वहात जातात आणि शरीरातील स्नायूंच्या तंतूत रुतून बसतात.त्याचे पुढे रेणूत रुपांतर होते.अन्नातून पोटात विष गेले की,अनेक रोगकारक प्रक्रिया सुरू होतात.

       मांसाहार हे अस्वाभाविक अन्न आहे.त्या अन्नामुळे पचनशक्तीला प्रतिबंध होतो.मांसाहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते,त्यामुळे रोग होतात. मांसाहारामुळे रुधिराभिसरण आणि श्वासोच्छ्वास यांत अडथळे येतात.मांसाहारी लोकांना हृदयरोग,छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.

***

     महत्वपूर्ण..

👇👇

      जगविख्यात प्रथम महाविज्ञानवादी तथा महातत्वज्ञानी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे.. १) पशुपक्षी व मनुष्य प्राण्यांची हत्या करणे किंवा हत्या करण्यास भाग पाडणे…२) त़बाखूजन्य मादक पदार्थांचे सेवन करणे किंवा सेवन करण्यास भाग पाडणे,३) मद्यपान करणे किंवा मद्यपान करण्यास भाग पाडणे हा चारित्र्य हननाचा भाग आहे.आणि असा कार्यभाग हा अकुशल कर्मात मोडतो असेही त्यांनी सांगितले आहे.

        प्रश्न हा पडतो की,” तथागत भगवान गौतम बुद्धांचा तत्वज्ञानातंर्गत त्यांच्या हयातीत व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर सुध्दा कुणीच पराभव केला नाही.कारण सर्व काळ त्यांचे विचार सर्वांसाठी कल्याणकारी आहेत.

        याचबरोबर त्यांच्या विज्ञानवादी वैचारिक दृष्टिकोनातंर्गतच जगप्रसिद्ध संशोधकांनी संशोधन केलेले आहे.

***

बौध्दिक दिवाळखोर..

👇👇

       दैनंदिन दिनचर्या अन्वये,” पक्षाच्या व देशाच्या विशेष नेत्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने,” एखाद्या कार्याचा प्रारंभ व शेवट हा अकुशल कर्मात मोडत असेल व त्या कर्मातंर्गत अयोग्य कार्य घडवून आणले जात असेल तर याला उत्तम कार्य समजायचे काय? किंवा विशेष स्मृतिदिनानिमित्त अयोग्य कार्यपध्दत रुढ करण्याचा प्रकार घडत असेल तर पत्रकारांनी किंवा वार्ताहरांनी कायमचे निद्रिस्त व्हायचे काय?

     आणि ज्यांनी यावर बातम्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकला त्यांना बौध्दिक दिवाळखोर म्हणायचे काय?

        तद्वतच ते कुणाचे तरी कटपुथली किंवा बाहुले बनून काम करतात असे त्यांच्यावर निराधार आरोप करायचे काय?

 ***

      मदत..

👇👇

       पत्रकार म्हणून किंवा मित्र समजून नेत्यांना,पदाधिकाऱ्यांना,कार्यकर्त्यांना जरुर मदत करावी..तो पत्रकारांचा त्यांच्या परी कदाचित मैत्रिभाव असू शकतो.

        याचबरोबर सर्वांच्या पत्रकारितेकडे सर्व नागरिकांचे कमी जास्त प्रमाणात लक्ष असतेच..हे उरफोडून सांगण्याची गरज नाही.. 

          मात्र,विशेष स्मृतिदिनाचे महत्व जाणून न घेतल्यास,त्या अनुषंगाने परिणाम व प्रभाव पुढे येतातच,…