बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची संपूर्ण देशामध्ये प्रसिद्धी आसल्यामुळे चौथ्यांदा संसदरत्न सुप्रियाताई सुळे दिल्लीच्या संसदेत खासदार म्हणून जाणारच यात शंकाच नाही.
बारामती लोकसभेची निवडणूक जाहीर झाली फॉर्म भरले प्रचाराला सुरुवात झाली. एका पक्षात दोन ठिकाणी विभागणी, आसा प्रकार पवार फॅमिली कुटुंबात झाल्यामुळे गाव पातळीवर तालुका स्तरावरील कार्यकर्त्यात दुफळी निर्माण झालेली पहावयास मिळाली आहे. एकाच कुटुंबात दोन विरोधक संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्रा वहिनी पवार आसा सामना आसल्यामुळे खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचे पारडे जड तर चांगलाच प्रतिसाद आसल्यामुळे मतदाराचा कौल सुप्रियाताई सुळे यांच्याच बाजूने आसणार आहे. यात काही शंकाच नाही.
चालू वर्षी 2024 साठी बारामती लोकसभा मतदार संघात ननंद भावजयची अस्तित्वाची लढाई पाहण्यासाठी राज्यासहित संपूर्ण देशामध्ये लक्षवेधी ठरणार आहे. मतदाराचा कौल हा योग्य दिशेनेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाजूने जाणार आहे. एकीकडे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे गेली 15 वर्षापासून दिल्लीच्या संसदेत खासदार म्हणून काम करीत आहेत.
संसद रत्न पुरस्कारही मिळालेला आहे.संसदेत केलेली कामगिरी या माध्यमातून संपूर्ण बारामती मतदार संघात विकासाची गंगा आणली आहे.
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आसल्यामुळे यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे आहेत. शेतकऱ्यांसाठी आनेक योजना, गोरगरिबांचे प्रश्न, भारत देश हा शेतीप्रधान देश आहे.
कृषिमंत्री आसताना चौफेर विकास करून गरिबांना कामे, शेत मालाला योग्य भाव, शिक्षण क्षेत्रातील विविध ठिकाणी प्रत्येक गावोगावी शालेय संस्था, आसा सर्वांगीण विकास आहे, अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, घरकुल योजना, संपूर्ण योजनेचा प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळवून दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला परंतु पक्षात परिवर्तन होऊन दोन पक्षाची दुफळी निर्माण झाल्यामुळे घड्याळ चिन्ह मिळाले नाही. याबद्दल शरद पवार गट नाराज नसून तुतारी फुंकणारा माणूस या चित्रावर योग्य बटन दाबून मतदार राजा खासदार सुप्रियाताई सुळे यांना चौथ्यादा दिल्लीच्या संसदेत पाठविणार यात काही शंकाच नाही.
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार गटाचे सर्वच कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला गतीने लागले आहेत घोंगडी बैठका गाव भेटी दौरा सर्व कार्यकर्त्यांचा चालूच आहे. मतदारांना माहितीसाठी पत्रिकेवरील चिन्ह कोणते आहे ते पटवून सांगणे यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ चालू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधून शरद पवार गटातून खासदार सुप्रियाताई सुळे यांना उमेदवारी मिळालेली आहे.
येथून पाठीमागे विकास हा शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे झाला शेतीसाठी आनेक सुविधा व गोरगरिब शेतमजुरांसाठी विकास कामे केले. व गरजुना मागिल तेवढी गरज केली तर शेतमजुरसाठी मोठ्या प्रमाणात विकास करून कामे मार्गी लावली, तरुणांना नोकऱ्या मिळऊन दिल्या आशे आनेक प्रश्न शरदचंद्रजी पवार साहेब व सुप्रियाताई सुळे यांनी केलेल्या कामाच्या पोचपावती मुळे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची बाजू मजबूत झाल्यामुळे जनतेचा कौल हा तुतारी वाजविणारा माणूस डोळ्यासमोर ठेवूनच मतदार राजा मतपेटीत आपले मतदान करणार.