ऋषी सहारे
संपादक
कोरची तालूक्यातील मोहगांव येथे आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोहले )क्षेत्रीय समीती मोहगांव यांच्या वतीने 24/04/2024 बुधवार दुपारी 2.00 वाजता रोजी आदिवासी कवर समाज आदर्श विवाह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवर समाजाचे महाराष्ट्र व छत्तीसगढ़ या दोन राज्यातील 10 वर-वधू जोडपी विवाहबद्ध झाली.
खाजगी विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळता यावा समाज कर्ज बाजारी होऊ नये याकरीता आदिवासी कवर समाजाचा वतीने मोहगांव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
आज आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे उदघाटन आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरत दुधनांग नाशिक होते. प्रमुख अतिथी म्हणून मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी कोरची,भिकम फुलकवर क्षेत्र अध्यक्ष आदिवासी कवर समाज, नसरूद्दीन भामानी तालुकाध्यक्ष भाजपा, पितांबर आरगदुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष, कवर समाज छ.ग.(म.हा),अंबिका बंजार सभापती देवरी, सुनिता मडावी सरपंच ग्रा.पं.कोचिनारा, राधेश्याम फुलकवर साहेब, कृष्णा चंद्रमा , हरिश्चंद्र पैकर, परमानंद पुजारी , आसाराम फूलकवर, पटले ग्रामसेवक, रूपराज देवागंन उपसरपंच, ,नरेश जमकातन,चेतन जमकातन लेखाधिकारी,पदमाकर मानकर माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, रूखमन घाटघुमर माजी जिल्हा उपाध्यक्ष कंवर समाज,प्रा.देवराव गजभिये ,मेघश्याम जमकातन नगरसेवक नगरपंचायत कोरची,आशिष अग्रवाल पत्रकार ,उमेश बागडेरिया कवर समाजात अध्यक्ष आंभोरा,जासल सांगसुरवार अध्यक्ष कवर समाज चिपोटा,लग्नुराम कार्यपाल अध्यक्ष कवर समाज कोटगुल, कलीराम चंद्रवंशी अध्यक्ष कवर समाज छुरिया,प्रकाश गंगाकाचुर सचिव महाराष्ट्र राज्य कवर समाज संघटना, राष्ट्रपाल नखाते, निराशाबाई पुजेरी सदस्य, सोबीत मडावी सदस्य,पुजेरी अंकेक्षक अधिकारी,प्रेमसिंग जमकातन माजी पोलीस पाटील, फिरोज फुलकवर ,देशीरबाई सोनकुकरा महिला अध्यक्ष ,भुपेंंद्र भंडारी,कुशल बंजार, पुष्पाताई दुधकवर ,दशरथ खोबा,अवधराम बांगमुळ सचिव, उतराबाई पुजेरी,ओमकार सुवा,लालसाय फुलकवर,मंदेश्वरी दुधनांग, मदन कोल्हे, सखीलाल बागडेरिया, घुरूराम सहाळा,उमरलाल दुधनांग,विजय जमकातन बरातु फुलकवर,रामेश्वर,कारीहरताल,हमिरदास दुधकवर,हिरवंत फुलकवर,दुखदास परचारी,कमलेश जाता,हेमराज सोनकोत्तरी,कुवरलाल सोनार,रजोलाबाई सोनार,आदि उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविकातून भिकम फुलकवर यानी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह करीत शाशकीय स्तरावरून आदिवासी कवर समाजाचा समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आमदार कृष्णा गजबे यानी समाजाला भेडसावणार्या समस्यां जाणून घेण्याकरीता समाजाची बैठक आयोजित करीत त्या मार्गी लावण्याकरीता शाशन स्तरावर पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश सोनकलंगी व द्वारका सांगसूरवार यानी तर आभार प्रदर्शन अवधराम बागमुळ सचिव यानी केले कार्यक्रमात महाराष्ट्र व छत्तीसगढ़ राज्यातील कवर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थीत होते.
तसेच वर वधु जोडपी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोहले)क्षेत्राचे अध्यक्ष भिकम फुलकवर, अवधराम बागमुळ सचिव, सखीलाल बागडेरिया, संघटने. पदाधिकारी याच्या हस्ते 10 जोडपे यांना प्रमाणपत्र देऊन नविन वैवाहीक जीवनाला शुभेछा दिला.