डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
भरत राजगडे,त्यांची पत्नी व दोन मुली असे चार जण पाऊस आल्यामुळे वृक्षा खाली असताना अच्यानक वीज पडून ते जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहवाशी असलेले भरत राजगडे यांनी कुरखेडा तालुक्यात एका लग्न समारंभासाठी दुचाकीने गेले होते.लग्न समारंभ आटोपून परत येत असताना देसाईगंज वडसा ते कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील दूध डेरी तुळशी फाटा जवळ वादळ व पाऊस सुरू झाल्यामुळे एक वृक्षा खाली ते थांबले होते.
काल सायंकाळच्या सुमारास वीज पडून एकाच कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले असल्याने सामाजिक मन हळहळले आहे.