प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सन २०२१ पासून भ्रष्टाचाराचे वादळ राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूरच्या माजी अध्यक्षांना,माजी उपाध्यक्षांना,माजी मानद सचिवांना व माजी संचालक मंडळातील पदस्थांसह खातेदार – ठेवीदारांना स्वस्थ जगू देत नसल्याचे वास्तव आहे.
मात्र,सदर पतसंस्थेत खरोखरच करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे की,पुर्नर अंकेक्षणा नुसार करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारांची अवास्तव कहाणी रेटून धरण्यात आली आहे हे पुढे चालून चौकशीच्या माध्यमातून किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया वरुन नागरिकांच्या लक्षात येणार आहेच.
श्री.मारोती पेंदोर हे पतसंस्थेचे व्यवस्थापक असतांना सन २०१२ ते सन २०२० पर्यंत दर वर्षाला संस्थेचे अंकेक्षण (आॅडीट) व्हायचे व सदर अंकेक्षणा नुसार राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर र.न.८०३ ही मुनाफ्यात असल्याचे स्पष्ट व्हायचे आणि संस्थेचे व्यवहार सुध्दा त्यांच्या कार्यकाळात सुरळीत चालायचे.
असे असताना माजी व्यवस्थापक श्री.मारोती पेंदोर हे ३१ आॅगष्ट २०२० ला सेवानिवृत्त झाल्यावर पतसंस्थेचे सन.,१) २०१२ ते २०२० पर्यंतचे परत पुर्नर अंकेक्षण करण्यासाठी कुणी घाट घातला?,२) पुर्नर अंकेक्षण कोणत्या उद्देशाने करण्यात आले?, ३) अंकेक्षण करतांना सर्व संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांना जबाबदार न धरता केवळ एकाच संचालकाला जबाबदार का म्हणून धरण्यात आले?, ४) याचबरोबर सदर संस्थेचे पुर्नर अंकेक्षण श्री.अरुण मेहरकुरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अवती भोवतीच का फिरले?, ५) पुर्नर अंकेक्षण करतांना माजी व्यवस्थापक श्री.मारोती पेंदोर,माजी उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे यांना आपली बाजू मांडण्यासाठी आॅडीटर राजेश लांडगे यांनी त्यांना प्रत्यक्ष का म्हणून बोलावीले नाही?,६) संस्थेचे आॅडीट करताना पतस़ंस्थेच्या काही संचालकांना विश्वासात घेऊन कोणत्या आधारावर अंकेक्षण करण्यात आले?,७) संस्थेच्या माजी अध्यक्षांची व माजी संचालकांची स्तुती आॅडीट नोट्स मध्ये कसी काय करण्यात आली? असे अनेक प्रश्न पुर्नर अंकेक्षणाच्या बाबतीत उपस्थित होतात.
तसेच सन.२०१२ ते २०२० पर्यंतच्या झालेल्या व्यवहाराचे दरमहा जमाखर्च व्यवस्थापक कमेटीच्या मासिक सभेत चर्चा व विचारविनिमय होवुन सर्वांच्या एकमत संमतीने पारीत होत होते.तद्वतच आर्थिक पत्रके,वार्षिक पत्रके,नफातोटा पत्रक,ताळेबंद पत्रक, व अंदाज पत्रक हे नेहमीच मासिक सभेत पारीत होत होते व मंजूरी अंतर्गत ते शासकीय कार्यालयात पाठवले जायचे आणि दरवर्षीच्या अंकेक्षण अहवालावरून आर्थिक हिशोब पत्रके लेखा परिक्षकाकडून प्रमाणित केली जायची.
तद्वतच सन १ एप्रिल २०१२ ते २०२० पर्यंत वेळोवेळी झालेल्या अंकेक्षण कालावधीच्या संगणक प्रिंट काढून त्यावरुन त्या त्या वर्षाच्या दरमहा रोकड प्रिंट नुसार अंकेक्षण झालेले आहे.जर दर वर्षाच्या आर्थिक व्यवहाराच्या प्रिंट काढल्या नसत्या तर त्या त्या वर्षाचे अंकेक्षण कसे काय झाले असते?हा प्रश्न निर्माण होतो आहे.यामुळे करण्यात आलेले पुर्नर अंकेक्षण वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचा दाट संशय दिसून येतो आहे.
संचालक पदस्थांना दरवर्षी देण्यात येणारे पॅकेट मनी असोत की त्यांच्या दरवर्षीच्या जेवणाच्या पार्ट्यांची रंगीत तालीम असो,याचबरोबर कर्मचारी यांच्या वेतन वाढीचे एरिअर्स मधून त्यांना दोनदा पन्नास टक्के देण्यात आलेली रक्कम असो की कर्मचारी प्रोत्साहन (बोनस) मधून १० टक्के त्यांनी घेतलेली रक्कम असो,याला तर तात्कालीन संचालक मंडळातील सर्व पदस्थ् जबाबदार असल्याचे दिसून येते.
एवढेच काय तर कर्मचारी नियुक्ती अंतर्गत घेण्यात आलेले लाखो रुपये मासिक सभेच्या ठरावातंर्गत ठराव बुकांमध्ये आली असल्याचे व ते सर्व रुपये संचालक मंडळातील तात्कालीन सर्व पदस्थांनी वाटून घेतल्याचे म्हणणे माजी उपाध्यक्ष श्री.अरुण मेहरकुरे यांचे आहे.
यावरून तात्कालीन संचालक मंडळातील पदस्थांच्या कारणाम्यांचे मायाजाल पुर्नर अंकेक्षणात लपवून का म्हणून ठेवण्यात आली?हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे.
पुर्नर अंकेक्षण करतांना काही अयोग्य व बेकायदेशीर प्रक्रिया व प्रक्रिया अंतर्गत प्रकार घडला काय?की अजून वेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडल्यात? याबाबत तात्कालीन सर्व संचालक मंडळातील पदस्थांची, संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांची, पुर्नर आडिटर राजेश लांडगे यांची नार्को टेस्ट चाचणी होणे गरजेचे आहे.