सिरोंचा नगर पंचायत येथे खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक…

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

   — खासदार अशोकजी नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन ट्रॅक्टर व रुग्णवाहिकाचे लोकार्पण सोहळा खासदार महोदयांचे हस्ते पार पडला..-

    सिरोंचा :- नगर पंचायत सिरोंचा येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.

      या आढावा बैठकीला प्रामुख्याने उपवन संरक्षक पुनम पाटील,तहसीलदार जितेंद्र शिकतोडे,संवर्ग विकास अधिकारी पांचाळ,नगराध्यक्षा फरजाना इफ्तेखार शेख,न,प.उपाध्यक्ष बबलू पाशा, भाजपा ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे,संघटन जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते दामोदर अरिगेलवार,कृ.उ.बा.समितीचे उपाध्यक्ष सतिश गंजीवार,भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी ,युवा मोर्चा नेते संदीप राचरलावार,यांच्या प्रमुख उपस्थितीत सिरोंचा येथे आढावा बैठक पार पडली. 

         येथील विविध प्रमूख समस्यांवर भाजप नेते दामोदर अरिगेलवार यांनी प्रस्तावनापर माहिती दिली. यावेळी अतिदुर्गम,डोंगराळ,आदिवासी भागात वाहन सेवा चालकाचे काम करणाऱ्या व विदेशात उच्च शिक्षण घेऊन जिल्ह्याचा नावलौकीक करणारी किरण कुर्मा व शिक्षणात प्राविण्य संपादन करून नावलौकिक मिळवणारा शैलेश तोकला यांचा खासदार अशोकजी नेते यांचे हस्ते नगर वासिय जनतेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

          त्यानंतर खासदार अशोकजी नेते यांनी यावेळी उपस्थित कृषी विभाग,बांधकाम विभाग आदिवासी विकास विभाग तहसिल कार्यालय,पंचायत समिती मंडळ अधिकारी ,तलाठी कृषी सहायक,पोलिस विभाग, यांना प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विभाग निहाय विकासकामाचा नियोजन करावे अशी सुचनाही आढावा बैठकीदरम्यान केले.यावेळी प्रामुख्याने विविध मुद्द्यावर खूप चर्चा झाली व अनेक नागरिकांनी विविध तक्रारी केल्यात.

        नागरिकांच्या तक्रारींचा यावेळी ढिग पडला.खासदार अशोक नेते यांनी सिरोंचा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.

       आजच्या बैठकीत सिरोंचा तालुक्यातील विविध गावातील नागरिक,पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक,नगरसेविका व अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे संचालन विजय करपते यांनी केले.