प्रबोधनकार कला संघटनेच्या वतीने तहसिलदार कदम यांचा सत्कार…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीच्या वतीने साकोली येथील तहसिलदार निलेश कदम यांना आज दि.२२ मार्च २०२५ रोजी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

     पिंडकेपार येथे गेल्या महिण्यात दि.१६ व १७ फेब्रूवारी २०२५ रोजी संघटनेच्या वतीने विदर्भस्तरीय भव्य लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम यांची उपस्थिती लक्षणीय ठरली होती.

         या महोत्सवात अनेक लोककलावंतांनी आपापली कला सादर करून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. या महोत्सवाला अनेक अधिकार्‍यांनी देखील उपस्थिती दर्शविली होती.

          प्रशासकीय क्रीडा स्पर्धेत तहसिलदार निलेश कदम व्यस्त असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांचे खूप मोठे मोलाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले. याची दखल घेवून संघटनेच्या वतीने तहसिलदार कदम यांचा साकोली येथील तहसिल कार्यालयात सन्मान करण्यात आला.

         या प्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, तालुका  समन्वयक उमेश भोयर,  तालुका अध्यक्ष धनंजय धकाते आदी उपस्थित होते.