बाम्हण गावात सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक..  — अगीत अनेक वस्तू भस्मसात…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

      चहा तयार करीत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन अख्खे घर जळाले.वेळीच आई मुलगा व सुन बाहेर पडल्याने मोठी जिवीतहानी टळली,यामध्ये 70 हजाराच्या रोख रक्कमेसह,सोन्याचा गोप व अंगठी जळाली आहे.

        ही घटना काल सोमवारी दुपारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव येथे घडली.आगीमध्ये मंजुळाबाई धर्माजी मेश्राम यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.

            माहिती नुसार,चिमुर तालुक्यातील बाम्हणगाव येथील मंजुळाबाई धर्माजी मेश्राम या रहिवासी आहेत.काल त्यांनी मुलगा,सुन व स्वःतासाठी गॅसवर चहा मांडला होता. 

       गॅस सुरू करताच थेट गॅस पासून पाईप जळायला लागला.त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि मंजुळाबाई मुलगा विकास व सुनेसह घरातून बाहेर पडली.काही क्षणातच पाईपची आग गॅस हंड्यापर्यंत पोहचून सिलेंडरचा स्फोट झाला.स्फोटामुळे आग लागून घराने पेट घेतला.

       सदर घटनेची माहिती लोकांना होताच.नागरिकांनी घराच्या दिशेने धाव घेतली.नागरिकांनी मिळेत तिथून पाणी आणून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

           परंतु या आगीमध्ये एक दिवसांपूर्वी बँकेतून काढून आणलेली रोख रक्कम 70 हजार,सोन्याचा गोप व अंगठी सह अन्नधान्य,कपडेलते संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

        लगेच सरपंच गजानन गुडधे यांनी संपर्क करुन चिमुर येथील अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आले.परंतु तो पर्यंत नागरिकांनीच आग आटोक्यात आणली. 

       नागरिकानी धावून आग आटोक्यात आणली नसती तर गावात आगीचा धोका झाला असता. स्फोट ऐवढा भिषण होता कि,सिलेंडरच्या चिंधड्या उडाल्या आहेत.

      नशिब बलवत्तर म्हणून मेश्राम कुटूंबिय वेळीच घराबाहेर पडल्याने ते बचावले आहेत.महसुल विभागाला या बाबत माहिती देण्यात आलेली असून सदर कुटूंबाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.