रात्रोचा फायदा घेत वाळू भरलेला ट्रॅक्टर सोडणारा तो अधिकारी कोण? — चिमूर तालुकातंर्गत पळसगाव (पिपर्डा) उमा नदीच्या पात्रातून करोडो रुपयांच्या वाळूचे खुल्लमं खुल्ला उत्खनन… — नेभळट व भ्रष्ट अधिकारी कोणत्या कामाचे? — स्पाॅट पंचनामा….

शुभम गजभिये 

   विशेष प्रतिनिधी 

        काल रात्रोच्या वेळी पळसगाव (पिपर्डा) जवळ वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडले व ट्रॅक्टर मालकासी झालेल्या चर्चाअंती ते वाळू भरलेले ट्रॅक्टर सोडून दिले असल्याची खमंग चर्चा आज दिवसभर मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील नागरिकांत सुरू होती.

       मात्र,रात्रोचा फायदा घेत वाळू भरलेले ट्रॅक्टर सोडून देणारा भ्रष्ट अधिकारी कोण? यावर कुणीही बोलायला तयार नाहीत.

         पण,असे भ्रष्ट आणि लायकी नसलेले अधिकारी चिमूर तालुक्याला लाभले असल्याने वाळू चोरांचे खूपच फावते आहे तर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे वारंवार खिसे गरम केले जात असल्याचेही बोलले जात आहे.

        आता तर पळसगाव,(पिपर्डा) येथील उमा नदीच्या पात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा वाळू चोर करीत असून या अवैध वाळू उत्खननाकडे चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष जात नाही.

       वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी किती रुपयात गुलाम झाले आहेत हेच आता पुढे यायचे बाकी राहिले आहे..

           अधिकारी जर वाळू चोरांसाठी काम करीत असतील तर अशा वाळू चोरांच्या साथीदार अधिकाऱ्यांची शासनाला काय गरज?