
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी…
पारशिवनी :- पारशिवनी तालुका अंतर्गत येत असलेल्या पो.स्टे.कन्हान मध्ये फिर्यादी नामे संदीप प्रमोद खडसे,वय २६ वर्षे, रा.सत्रापुर,यांच्या रिपोर्ट वरुन अप क्र. ०४/२०२० कलम ३०२,३४ भादंवि सहकलम ३ (२) (व्ही) अ.जा.ज.अ.प्रति अधिनियम अन्वये गुन्हा नोंद झालेला होता.
दिनांक ०६/०१/२०२० चे २२/०० ते २२/४५ वाजेच्या दरम्यान गौरव बार कन्हान येथे आरोपी नामे भुपेश उर्फ गोलु सुशिलकुमार शाहु, वय २० वर्षे, रा.कळमना मार्केट,नागपुर याने जोरात काचेचा ग्लास आपटुन तोडल्याने यातील मृतक नामे संजीव प्रमोद खडसे,वय ३४ वर्षे रा.सत्रापुर कन्हान,ता. पारशिवणी हा आरोपीला समजावित असतांना यातील आरोपी व मृतक यांच्या बाचाबाची झाली होती.
त्यावेळी यातील आरोपी सचिन प्रकाश वाडीभस्मे, वय २९ वर्षे, रा. रायनगर कन्हान याला मृतकाने दोन थापडा मारल्या होत्या,त्यामुळे यातील आरोपी नामे १) भुपेश उर्फ गोलु सुशिलकुमार शाहु,वय २० वर्षे, रा. कळमना मार्केट,२) सचिन प्रकाश वाडीभस्मे, वय २९ वर्षे, रा. रायनगर, कन्हान, ३) नितेश मुलचंद पटले, वय ३० वर्षे, रा. कळमना मार्केट, नागपुर आणि ४) स्वप्नील उर्फ चुहा महेंद्र मराठे,वय २१ वर्षे रा. कांद्री, कन्हान यांनी संगणमत करून मृतक संजीव प्रमोद खडसे, वय ३४ वर्षे,रा.सत्रापुर कन्हान, ता. पारशिवणी हा गौरव बार च्या बाहेर आल्यानंतर नमुद आरोपींनी दगड व चाकुने मृतकच्या डोक्यावर व पोटामध्ये वार करून गंभीर जखमी करून मृतकाचा खुन केला होता.
सदर प्रकरणाचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.संजय पुंजलवार यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते.
सदर प्रकरणात मा.जिल्हा व सत्र न्यायधीश (डि.जे.२) श्री.अब्बास शेख यांनी दिनांक २४/०३/२०२५ रोजी वरील नमुद आरोपी नामे १) भुपेश उर्फ गोलु सुशिलकुमार शाहु वय २० वर्षे, रा. कळमना मार्केट नागपुर,२) सचिन प्रकाश वाडीभस्मे, वय २९ वर्षे, रा. रायनगर कन्हान, ३) स्वप्नील उर्फ चुहा महेंद्र मराठे, वय २१ वर्षे,रा कांद्री, कन्हान यांना कलम ३२०,३४ भादवि मध्ये आजीवन कारावास व प्रत्येकी १० हजार रूपये दंड,दंड न भरल्यास प्रत्येकी ०६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी नामे नितेश मुलचंद पटले हा मयत झालेला आहे.