आरोग्यमंत्र्यांकडून मेळघाटातील आरोग्य यंत्रणेची झाडाझडती… — मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सतर्क;दुर्गम भागातील उपकेंद्रावर एक दिवस आधीपासूनच कर्मचारी व अधिकारी उपस्थित…

  अबोदनगो चव्हाण 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

        दखल न्युज भारत 

 महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर काल उशिरा रात्री आगमन सकाळी दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र हतर गाठले त्या ठिकाणच्या आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली.

         या ठिकाणच्या पाण्याची व इलेक्ट्रिकची समस्या व सोलर सिस्टीम बंद तसेच इतर समस्या जाणून घेतल्या या ठिकाणचे आदिवासी बांधवांची थेट चर्चा करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या या ठिकाणच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडून सोडवावी तसेच विजेची समस्या सुद्धा सोडवावी असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

             या ठिकाणी बऱ्याचश्या त्रुटी आढळल्या त्या तात्काळ पूर्ण कराव्यात उमेद गटातील आदिवासी बांधवांना उत्कृष्ट अशी आरोग्य सुविधा पुरवाव्यात असे आदेश आरोग्य मंत्री यांनी प्रशासनाला दिले.

           यावेळी हतरच ग्रामपंचायतचे सरपंच सुमित्रा बेठेकर उपसरपंच भैय्यालाल मावसकर उपस्थित होते त्यांनी या ठिकाणच्या समस्या आरोग्यमंत्र्यांना सांगितल्या यासह आरोग्यमंत्र्यांनी हिल्डा, खारी, बिबा बारुगव्हाण, जारिदा, चुरणी,काटकुंभ इत्यादी गावांना भेटी देऊन त्या ठिकाणचे आरोग्य समस्या जाणून घेतल्या व त्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांची थेट संवाद साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

              आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर त्यांच्यासोबत दौऱ्या दरम्यान मेळघाट चे आमदार केवलराम काळे चिखलदराचे तहसीलदार जीवन मोरणकर चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे , तालुका वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रविण पारिसे , तसेच आरोग्य विभागाची सर्वस अधिकारी या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

          हतरु प्राथमिक आरोग्य केंद्र येथील असुविधा पाहून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री चांगले संतापले असून मी या ठिकाणी येणार हे माहीत असून सुद्धा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था विज व इतर सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाहीत. तसेच या ठिकाणी असलेले सोलर चे लाईट सुद्धा बंद होते.

            त्यामुळे त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला दरम्यान तालुक्यातील हिल्डा,बारूगव्हाण, यासह चुरणी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी केली व या ठिकाणी सुद्धा अनेक कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत नाही असे उपस्थित नागरिकांनी सांगितले.  त्यांची सुद्धा कान उघाडणी केली दौऱ्या दरम्यान अनेक अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार असून अनेक अधिकारी धास्तावले आहेत.

           महाराष्ट्र राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून जबाबदारी आहे त्यामुळे मेळघाटात कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू मोठ्या प्रमाणात आहे.या समस्या सोडवण्याचे उद्देशाने मेळघाटला भेट दिली आहे. या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोलताना सांगितले.