
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
सन 2024 – 2025 मध्ये TB रोगान्वये ग्रामपंचायत सावरी यांच्या उलेखनिय कामगिरी बाबत,”जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून सोमवारला जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सरपंच लोकनाथ रामटेके यांचा सत्कार करण्यात आला अर्थात ग्रामपंचायत सावरीचा सत्कार सिईओ यांनी केलाय……
त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कटारे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले उपस्थित होते…
सरपंच लोकनाथ रामटेके हे शासकीय अधिकारी यांना भेटून गाव विकासासाठी कामे खीचून आणण्याचा प्रयत्न करतात हे त्यांचे उल्लेखनीय कर्तव्य आहे.
याचबरोबर शासन स्तरावरील सर्व आदेशीत उपक्रम सरपंच लोकनाथ रामटेके हिरहिरिने राबवून घेतात.यामागचा उदेश एवढाच की ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामवाशियांना सर्व शासकीय योजनांचा लाभ व्हावा.
टिबी मुक्त गाव प्रमाणपत्र स्विकारताना आणि सन्मानित होतांना सरपंच लोकनाथ नारायण रामटेके यांच्यासह,उपसरपंच निखिल डोइजळ,दिलिप मोटघरे,रामदास खामनकर,आशिष घोनाडे,सदस्यां सुरेखा शेंबेकर,सदस्यां अर्चना हनवते,किरण मेश्राम, उपस्थित होते.